आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक प्रदर्शन आजपासून; मेंदूच्या क्रिया समजणाऱ्या कारसह 20 हजारांपेक्षा जास्त उत्पादने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लास वेगास कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सीईएस-२०१८ साठीच्या मंडपावर अखेरचा हात फिरवला जात आहे. - Divya Marathi
लास वेगास कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सीईएस-२०१८ साठीच्या मंडपावर अखेरचा हात फिरवला जात आहे.

लास वेगास- जगातील सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक प्रदर्शन (सीईएस) ९ जानेवारीपासून सुरू होत आहे. चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये अमेरिकेसह जगभरातील टेक/ इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या त्यांच्याकडील नवे गॅजेट्स लाँच करतील. स्मार्ट टीव्ही, स्मार्ट फोन, लॅपटॉप आणि हेल्थ गॅझेटसह अनेक नवीन अत्याधुनिक फीचर असलेली उत्पादने सीईएसमध्ये सादर होतील.

 

कनेक्टेड-ड्रायव्हरलेस कार, फाइव्ह-जी टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, एआर-व्हीआर आणि गेमिंग टेक्नॉलॉजीविषयी ताजे अपडेट सांगितले जातील. या वेळी पहिल्यांदाच  गुगल सहभागी होणार आहे. या आधी गुगलने एकाही प्रदर्शनात मोठी घोषणा केलेली नाही. या प्रदर्शनासाठी २६ लाख चौ.फूट परिसर आरक्षित करण्यात आला आहे.  २०१७ मध्ये २ हजार नवी उत्पादने सादर झाली होती. यावर्षी यापेक्षा जास्तीची अपेक्षा आहे.  

 

१५० देशांमधून प्रतिनिधी आले आहेत  

 

> २,००,००० व्हिजिटर्स - टेक प्रोफेशनल्स पोहोचले आहेत, १५० देशांमधून.  

> ४,०००  पेक्षा जास्त प्रदर्शक. ८७ % फॉर्च्युन १०० कंपन्यांचा समावेश.  

>  ७,००० पत्रकार पोहोचले आहेत जगभरातील वृत्तपत्रांचे.  

>  १२,००० वक्ते, त्यांचे म्हणणे मांडतील ६५ परिषदांमध्ये.  

> ७,००,००० उत्पादने लाँच झाली आहेत, ५० वर्षांत प्रदर्शनात

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, जीवनाला असे सुलभ करणार नवीन तंत्रज्ञान आणि डिव्हाइस ... 

 

बातम्या आणखी आहेत...