आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयात शुल्क घटवण्यासाठी भारतावर अमेरिकेचा दबाव;भारत -अमेरिकेदरम्यान व्यावसायिक तणाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारत आणि अमेरिकेदरम्यान पुन्हा एकदा व्यावसायिक तणाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमेरिका भारतावर आयात शुल्क कमी करण्यासाठी दबाव वाढवत आहे. यामागे अमेरिकी उद्योग जगाबरोबरच राजकीय मंडळींचाही हात आहे. अमेरिकी सरकारने मागील आठवड्यातच भारत सरकारला याविषयी कल्पना दिली होती, असे येथील एका रिपब्लिकन खासदाराने सांगितले. डब्ल्यूटीओच्या वतीने मान्य करण्यात आलेल्या दरापेक्षा भारतात आयात शुल्क जास्त असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकी ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह कार्यालय भारतात आयात शुल्क वाढवल्यामुळे होत असलेल्या नुकसानीचा आढावा घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मोदी सरकारने डिसेंबर महिन्यात मोबाइल फाेन आणि टीव्हीसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या आयातीवर शुल्क वाढवले होते. त्यानंतर एक फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्पातदेखील सुमारे ४० वस्तूंवरील आयात शुल्क वाढवण्याची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये सन ग्लास आणि ज्यूससह वाहन उद्योगासाठी लागणाऱ्या  सुट्या भागांचाही समावेश होता.  आयात शुल्क वाढवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्यच असल्याचे अर्थ मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. भारतावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे कारण नाही, असेही ते म्हणाले.  

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, भारताचा ९.७७ % विदेशी व्यापार अमेरिकेसोबत... 

बातम्या आणखी आहेत...