आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिरिक्त पैशाचा वापर गुंतवणुकीची रक्कम वाढवण्यासाठी करा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन वर्षाची सुरुवात बोनस, पगारातील इन्क्रिमेंट, अतिरिक्त फंड सारख्याने होते. मात्र, अनेकदा अतिरिक्त पैसा एकतर बँक खात्यात तसाच पडून राहतो किंवा आपण तो पैसा  बिनकामाच्या गोष्टींवर खर्च करतो. जर आपण या पैशाचा वापर पैसा कमावण्यासाठी केला तर चांगले होईल. तुम्ही या अतिरिक्त पैशाचा वापर म्युच्युअल फंडातील सध्याच्या गुंतवणुकीला जोडू शकता. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची सर्वात चांगली पद्धत सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपी ही आहे. मात्र, तुमच्याजवळ अतिरिक्त पैसे आले तर त्यातून तुम्ही अतिरिक्त युनिटचीही खरेदी करु शकता.   


बाजारातील घसरणीचा फायदा घ्या

सामान्यपणे बाजारात चढ-उताराचे चक्र सुरुच असते. बाजार वेळोवेळी गुंतवणूकदारांना खरेदी करण्याची संधी देत असतो. शेअरचे भाव कमी झाल्यास खरेदीदारांसाठी चांगली संधी असते. त्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओतील सरासरी खर्च कमी होतो. हेच म्युच्युअल फंडावरही लागू होते.

याला आपण उदाहरणातून समजून घेऊयात.

  

समजा तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करता. प्रत्येक महिन्याच्या १० तारखेला तुमच्या बँक खात्यातून २,००० रुपये कट होतात. आता सर्व खर्च झाल्यानंतर तुमच्याकडे ५,००० रुपये शिल्लक राहिले. बाजारातही घसरण सुरू आहे. तुम्ही ५,००० रुपयांची बचत एसआयपीव्यतिरिक्त गुंतवू शकतात. हुशार गुंतवणूकदार अशा संधीचा फायदा घेतात. ते शेअर किंवा बाँडच्या किमतीत घसरण झाल्यास त्यामध्ये गुंतवणूक करतात.   
अतिरिक्त गुंतवणुकीतून कसा मिळतो फायदा? : समजा तुमची २,००० रुपयांची एसआयपी २० वर्ष म्हणजेच २४० महिन्यांसाठी आहे.

 

तुम्ही ही एसआयपी मुलांचे उच्च शिक्षण, मुलीचे लग्न अशा दीर्घ मुदतीमधील उद्दिष्टासाठी काढली आहे. एसआयपीच्या माध्यमातून २० वर्षांत ४.८ लाख रुपयांची गुंतवणूक करतात. तुमची गुंतवणूक दीर्घ मुदतीसाठी आहे. त्यामुळे तुमचा पोर्टफोलिओ घसरण आणि तेजी अशा अनेक चक्रातून जाईल. अतिरिक्त गुंतवणुकीमुळे केवळ तुमच्या गुंतवणुकीतील खर्चच कमी होणार नाही तर गुंतवणुकीची रक्कम देखील वाढेल. बाजारात घसरण होत असताना तुमच्यासाठी गुंतवणुकीचा निर्णय घेणे अवघड जाईल. मात्र, आदर्श गुंतवणुकीचा हाच खरा मंत्र आहे - “बाय लो अँड सेल हाय’. म्हणजेच घसरणीमध्ये खरेदी करा आणि तेजी मध्ये विक्री. हीच बाब इक्विटीसह सर्व प्रकारच्या गुंतवणुकीसाठी लागू होते.
दीर्घ मुदतीमध्ये जास्त परतावा मिळेल : बाजारात घसरण असताना अतिरिक्त पैशातून शेअरची खरेदी करणे हुशारी आहे. दीर्घ मुदतीमध्ये कंपाउंड म्हणजेच चक्रवाढ वाढीमध्ये परतावा मिळेल. तुम्ही निश्चित केलेल्या उद्दिष्टापेक्षाही तुम्हाला जास्त रक्कम मिळेल. कामात व्यस्त असल्याने अनेकदा तुम्हाला बाजारावर लक्ष ठेवता येणार नाही. अशा वेळी तुम्ही आर्थिक सल्लागाराची मदत घेऊ शकता. अतिरिक्त खरेदी संदर्भात सल्लागाराला आधीच सांगून ठेवा. योग्य वेळ आल्यावर तो तुम्हाला सांगेल.


- हे लेखकाचे खासगी मत आहे. या आधारावर गुंतवणुकीतून नुकसान झाल्यास ‘दिव्य मराठी’ जबाबदार राहणार नाही.

बातम्या आणखी आहेत...