आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्ही-गार्ड उत्तर, पश्चिम अन् मध्य भारतात करणार विस्तार; सध्या या भागात 35 % भागीदारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू- दक्षिण भारतातील इलेक्ट्रिकल्स कंपनी व्ही-गार्डने उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतात विस्तारीकरणाची योजना तयार केली आहे. सध्या या भागात कंपनीची ३५ टक्के भागीदारी आहे, जी पाच वर्षांत वाढवून ५० टक्के करण्याचे उद्दिष्ट आहे. कंपनीचे एमडी एम. चितिलापिल्ली यांनी बुधवारी ही माहिती दिली. कंपनी देशातील २८,००० रिटेलर्सच्या माध्यमातून वस्तूंची विक्री करते. यातील २०,००० दक्षिणेतील राज्यात आहेत.  


कोच्चीला मुख्यालय असलेली ही कंपनी किचन अप्लायन्सेस आणि इलेक्ट्रिकल वस्तूंची निर्मिती करते. या वस्तूंचा देशांतर्गत बाजार ७५,००० कोटींचा आहे. मात्र, यात व्ही गार्डची भागीदारी ३ टक्के आहे. भागीदारी वाढवण्यासाठी संचालक मंडळाने ५०० कोटींच्या गुंतवणुकीच्या योजनेला मंजुरी दिली आहे. कंपनीकडे १०० कोटी रुपयांची नगदी आहे. सध्या व्ही-गार्डवर कोणतेही कर्ज नसल्याने गुंतवणूक मिळवण्यास अडचण येणार नसल्याचे चितिलापिल्ली यांनी म्हटले आहे.  


१९७७ मध्ये स्थापन झालेली व्ही-गार्ड ४० टक्के उत्पादने स्वत: बनवते तर ६० टक्के आऊटसोर्स करते. २०१६-१७ मध्ये कंपनीचा महसूल २,१५० कोटी रुपये तर नफा १५२ कोटी रुपये होता. यातील ५५ टक्के महसूल टीअर थ्री-फोर शहरातून अाणि ग्रामीण भागातून येत असल्याचे चितिलापिल्ली म्हणाले. अर्थसंकल्पात ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केल्याने उत्पादनाची मागणी वाढण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  


नोटबंदी, धातू आणि इतर कच्चा माल महाग झाल्याने कंपनीच्या विकास दरावर थोडा परिणाम झाला आहे. महसूल वाढ १५ टक्के आहे जी आधी २५ टक्के होती. पुढील आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था सुधारल्याने पुन्हा महसुलात वाढ होण्याची अपेक्षा एमडींनी व्यक्त केली. कंपनीमध्ये कामगारांची आवश्यकता कमी असल्याने सध्या कंपनी ऑटोमेशनवर विचार करत नसल्याचे त्यांनी या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.  येथे मोठमोठ्या मशिनरींचा वापर होत असलेल्या ऑटोमोबाइल उद्योगांतच ऑटोमेशनचा वापर होतो.   

 

आयओटी उत्पादनावर लक्ष  
व्ही-गार्ड इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) वर आधारित उत्पादनावर लक्ष केंद्रित करत आहे. अलीकडेच कंपनीने स्मार्ट गीझर आणले, जे अॅपच्या माध्यमातून जगभरात कोठूनही ऑपरेट करता येते. यात काही बिघाड झाल्यास हे स्वत: कस्टमर केअरला माहिती पाठवेल. पुढील महिन्यात कंपनी एलईडी फॅन आणणार आहे. चितिलापिल्ली यांनी सांगितले की, लवकरच ते नवीन किचन अलायन्सेस, मॉड्युलर स्विच आणि एअर कूलर लाँच करणार आहेत. त्यांनी बुधवारी कंपनीचा नवीन लोगोदेखील लाँच केला.

बातम्या आणखी आहेत...