आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगा कमावतो पैसा तर सून मिळवते आशीर्वाद, अशी आहे अंबानींच्या मुलगा-सूनेची जोडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्लीः मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुकेश अंबानींचा थोरला मुलगा आकाश अंबानी लवकरच विवाहबद्ध होणार आहे. हि-यांचे व्यापारी  आणि रोजी ब्लूचे मालक रसेल मेहतांची धाकटी मुलगी श्लोका मेहतासोबत आकाश अंबानीचे लग्न जुळले आहे. यावर्षी डिसेंबरमध्ये दोघांचे लग्न होणार असल्याची चर्चा आहे. तर येत्या 24 मार्च रोजी दोघांचा साखरपुडा होऊ शकतो. अद्याप दोन्ही कुटुंबाकडून या नात्याविषयीची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 


एक नजर टाकुया, आकाश अंबानी श्‍लोका मेहताशी निगडीत काही रंजक फॅक्ट्सवर...

 

एक कमावतो पैसा, तर दुसरी मिळवते आशीर्वाद..

आकाश अंबानी आणि श्‍लोका मेहता जर पती-पत्नी झाले, तर दोघांची जोडी अतिशय वेगळी ठरले. बिझनेस फॅमिलीतून असूनदेखील श्लोकाने फॅमिली बिझनेस जॉईन न करता सामाजिक कार्य करत आहे. इंडियन कॉर्पोरेट वर्ल्‍डमध्ये श्‍लोका मेहता चॅरिटी आणि फिलेंथ्रोपी वर्कसाठी प्रसिद्ध आहे. तिच्या फिलेंथ्रॉफी वर्कवर अनेक मीडिया रिपोर्ट्स प्रकाशित झाले आहेत. तर दुसरीकडे आकाश अंबानी त्याचा फॅमिली बिझनेस सांभाळत आहे. आकाश अंबानीने बिझनेसमध्ये पाऊल ठेवल्यानंतर आरआईएलची वॅल्‍यू वाढत चालली आहे.

 

सोर्स: मीडिया रिपोर्ट 


पुढे वाचा, आकाश अंबानी आणि श्लोका मेहताविषयी बरंच काही... 

बातम्या आणखी आहेत...