आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विस्ताराने तीन वर्षांत मिळतील 23 लाख नवे राेजगार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अाैद्याेगिक क्षेत्रात यंत्रांच्या वाढत्या वापराने अनेक तज्ज्ञांद्वारे व विविध अहवालांतून अशी शंका व्यक्त करण्यात अाली अाहे की, यामुळे माेठ्या प्रमाणावर राेजगार कमी हाेतील. कृत्रिम बुद्धिमत्ता ही अागामी काळात राेजगारांसाठी सर्वात माेठा धाेका असल्याचे सांगितले जात अाहे. हे असे तंत्रज्ञान अाहे, जे जवळपास सर्वच क्षेत्रांत मानव संसाधनाच्या साह्याविना कामास अधिक चांगले व वेगाने करण्याची क्षमता ठेवते. त्यामुळे उद्याेगांत अधिक परिपक्वता अाणणे व खर्च कमी करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर वाढणे स्वाभाविक अाहे. परिणामी, राेजगारांच्या संधी कमी हाेतील; परंतु यामुळे नवीन राेजगारांच्या संधी निर्माण हाेतील, हीदेखील याची एक चांगली बाजू अाहे. एका अहवालानुसार कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे एकीकडे २०२०पर्यंत १८ लाख राेजगार कमी हाेतील, तर दुसरीकडे २३ लाख नवीन राेजगार निर्माण हाेणार अाहेत. त्यामुळे तरुणांना नव्या काैशल्यातून यात राेजगाराच्या संधी उपलब्ध हाेतील.


नुकत्याच जाहीर झालेल्या एका अहवालानुसार कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे २०३५पर्यंत देशाच्या अर्थव्यवस्थेत ९५७ अब्ज डाॅलर्सची वाढ हाेऊ शकते. यामुळे लाेकांची अार्थिक अावकही १५ % वाढेल. इंटेलच्या एका अहवालात म्हटले अाहे की, २०२०पर्यंत देशातील सुमारे ७० % कंपन्यांत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हाेण्यास सुरुवात हाेईल. तसेच ७६ % कंपन्यांत कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित नाेकरी करणाऱ्या कुशल व्यावसायिकांचा अभाव असेल. तथापि, सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर काम करणाऱ्या कंपन्यांबाबत भारताची भागीदारी केवळ ६ % अाहे; परंतु ती वेगाने वाढतेय.


हेल्थकेअर क्षेत्रापासून ते बंॅकिंग व कृषी क्षेत्रात अागामी काळात या तंत्रज्ञानाचा वापर पाहायला मिळेल. त्यात सर्वाधिक राेजगाराच्या संधी डाटा संशाेधक, यंत्र प्रशिक्षण, यूअाय, यूएक्स डिझायनर, ब्लाॅकचेन डिझायनर व क्लाऊड साॅफ्टवेअर अभियंता यासारख्या व्यावसायिकांसाठी असतील.


मशीन लर्निंग डेव्हलपर
मशीन लर्निंग डेव्हलपर व्यवसायातील गरजा लक्षात घेऊन यासाठी स्वयंचलित टूल-उपकरणांचे डिझाइन करणे व तयार करण्याचे काम केले जाते. यात नाेकरीसाठी संगणक विज्ञानाची पायाभूत व प्राेग्रामिंगची माहिती याशिवाय व्यवसायाची शक्यता व संख्याशास्त्रासह डाटा माॅडेलिंगचे ज्ञान असणेही गरजेचे अाहे. साॅफ्टवेअर इंजिनिअरिंग व सिस्टिम डिझाइनचे ज्ञान ठेवणारे व्यावसायिक मशीन लर्निंगमध्ये करिअर करू शकतात.


क्लाऊड साॅफ्टवेअर अभियंता
संगणक विज्ञानातून पदवी मिळवणारे यात करिअर करू शकतात. विज्ञानातून १२वी करणारे विद्यार्थी संगणक विज्ञान व अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात. जावा, सी, सी++, पायथन, सी#, जावा स्क्रिप्ट, पीएचपी, एसक्यूएल यासारख्या प्राेग्रामिंग भाषांची माहितीदेखील अावश्यक अाहे. यात विशेषज्ञ हाेण्यासाठी पदवीनंतर क्लाऊड काॅम्प्युटिंगचा डिप्लाेमा वा प्रमाणपत्र अभ्यासक्रम करू शकता.


डाटा संशाेधक
डाटाचे अाकलन करणे व नवीन ट्रेंडची माहिती मिळवणे, हे या व्यावसायिकांचे काम असते. याशिवाय डाटा अार्किटेक्ट हा डाटा व्यवस्थापन सिस्टिमची ब्ल्यू प्रिंट तयार करण्याचे काम करताे. संगणक विज्ञानातून पदवी व प्राेग्रामिंगची माहिती असणे नव्या ट्रेंडसाठी मूलभूत गरज अाहे. डाटा संशाेधक बनण्यासाठी एसक्यूएल, अार, पायथन, हॅडहूप, जावा, नेटवर्क/ग्राफ, जावा स्क्रिप्ट, एसएएस, रुबी यासारखी तांत्रिक काैशल्ये गरजेची अाहेत. संगणक विज्ञान व अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम केल्यानंतर क्लाऊड काॅम्प्युटिंगचे अल्पकालीन अभ्यासक्रम केले जाऊ शकतात.


१४ लाख रुपये असेल सरासरी वार्षिक वेतन पॅकेज
उच्च काैशल्याची नाेकरी असल्याने यासाठी वेतन पॅकेजही अधिक असते. या क्षेत्रात नाेकरी करत असलेल्यांचे सरासरी वार्षिक पॅकेज १४ लाख रुपये असते. एका अहवालानुसार या क्षेत्रातील ४२ % व्यावसायिकांचे वार्षिक पॅकेज सहा लाख, २७ % व्यावसायिकांचे वार्षिक पॅकेज १० ते २५ लाख, तर ५ % व्यावसायिकांचे वार्षिक वेतन पॅकेज ५० लाख रुपयांहूनही अधिक असते. 

बातम्या आणखी आहेत...