आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • 44% More Transaction Than Card Issuance; Still 3% Of Cash Withdrawal From The ATM

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटबंदीपूर्वीच्या तुलनेत कार्डद्वारे 44% अधिक व्यवहार; तरीही एटीएममधून रोख काढण्याच्या प्रमाणात3 % घट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरात अनेक एटीएममध्ये एकाच वेळी नोट टंचाई निर्माण झाली आहे. यासाठी विविध कारणे सांगितली जात आहेत. यात २००० रुपयांच्या नोटांची बेसुमार साठवणूक हा मुद्दाही आहेच. बहुतांश वरिष्ठ बँकर्स तसेच तज्ज्ञांची एका मुद्द्यावर सहमती आहे. तो मुद्दा म्हणजे वितरण. सध्या चलन पुरवठ्याच्या तुलनेत जीडीपी दर अधिक आहे.


मात्र, एटीएमवरून रोख काढण्याचा आपला मोह कमी झालेला नाही, हे मात्र या काळात स्पष्ट झाले आहे. आरबीआयची आकडेवारी बोलकी आहे. नोटबंदीच्या पूर्वी ऑक्टोबर २०१६ मध्ये देशभरातील एटीएममधून जितकी रक्कम काढली जात होती, फेब्रुवारी २०१८ मध्ये त्यामध्ये केवळ ३% घट झाली आहे. ऑक्टोबर २०१६ मध्ये देशभरात एटीएममधून २.५५ लाख कोटी रुपये काढले गेले होते. फेब्रुवारी २०१८ मध्ये २.४८ लाख कोटी रुपये काढले गेले. एटीएममध्ये रोख टंचाई निर्माण झाल्यानंतरची ही आकडेवारी आहे. डिसेंबर २०१७ मध्ये नोटबंदीच्या पूर्वीच्या तुलनेत ९ हजार कोटी रुपये अधिक रोख काढली. नोटबंदीच्या पूर्वीची जानेवारी २०१८ मधील  ही आकडेवारी आहे.  
कार्डच्या माध्यमातून पेमेंट होत असूनही एटीएमद्वारे व्यवहार घटले नाहीत. ऑक्टोबर २०१६ मध्ये ५१ हजार कोटी रुपयांचा व्यवहार कार्डच्या माध्यमातून झाला होता. फेब्रुवारी २०१८ मध्ये हे प्रमाण ४४% वाढून ७४ लाख कोटी रुपये झाले आहे. एटीएममधून काढल्या जाणाऱ्या रकमेच्या तुलनेत हे ३.३ पट कमी आहे.

 

वितरणासाठी पुरेशी चलनवाढ करणे वर्तमान स्थितीत गरजेचे आहे का ?  

अर्थतज्ज्ञांच्या मते वितरणासाठी सध्या उपलब्ध असलेले चलन देशाच्या जीडीपीच्या  (सर्वसामान्य) ११ ते १२ % असले तर योग्य आहे. या निकषानुसार जीडीपीसोबत यात वाढ आवश्यक आहे. आर्थिक वर्ष २०११-१२ ते २०१५-१६ पर्यंत दरवर्षी चलनातील वाढ ११. ६ पेक्षा अधिक होती. मात्र नोटबंदी झालेल्या वर्षी घटून ती ८.८ % झाली आहे. पुढचे आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये १०.९ % होती. आर्थिक वर्ष २०१२ ते २०१६ दरम्यान देशाच्या जीडीपीमध्ये ५७.५ % वाढ झाली आहे. तेव्हा देशात चलनात अस्तित्वात असलेल्या रोखीमध्येदेखील ५५.६ % वाढ दिसून आली. म्हणजे जीडीपी व चलनात रोखीची वाढ समान दराने झाली होती. मात्र नोटबंदीच्या वर्षी आर्थिक वर्ष २०१७ व १८ मध्ये जीडीपी २१.७% वाढला तर चलनात रोख १०% वाढली. जीडीपी विकास दर तसेच चलनातील रोखीचा विकास दर यामध्ये तफावत निर्माण झाली आहे. 

 


पुढील स्लाईडवर वाचा ATM वर रोकड टंचाईचे परिणाम. 

बातम्या आणखी आहेत...