आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदासाठी ९ नावांची यादी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदासाठी नऊ उमेदवारांची यादी तयार करण्यात आली असून मंत्रिमंडळ सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती १० मे रोजी त्यांच्या मुलाखती घेणार आहेत. डेप्युटी गव्हर्नर एस. एस. मुंदडा यांचा कार्यकाळ मागील वर्षी जुलै महिन्यातच पूर्ण झाला आहे. या पदासाठी सुमारे ४० अर्ज आले होते.

 

फायनान्शियल क्षेत्रातील नियामक अपॉइंटमेंट सर्च कमिटीने यातील ९ नावांची निवड केली आहे. यामध्ये आयडीबीआय बँकेचे एमडी एम. के. जैन, एसबीआयचे एमडी एस श्रीराम आणि पीके गुप्ता यांचीही नावे आहेत. केंद्रीय बँकेला चार डेप्युटी गव्हर्नर असतात. यातील दोन व्यक्ती रिझर्व्ह बँकेचे, तर एक व्यावसायिक बँकिंग क्षेत्रातील आणि एक अर्थतज्ज्ञ असतो.

बातम्या आणखी आहेत...