आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारचा एक निर्णय अन् कंपनीचे बदलले भाग्य, कमावले तब्बल 700 कोटी रूपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीईएमएल या सरकारी कंपनीचे नशिब काही मिनिटांत पालटले. - Divya Marathi
बीईएमएल या सरकारी कंपनीचे नशिब काही मिनिटांत पालटले.

नवी दिल्ली- स्टॉक मार्केटमध्ये काही क्षणात करोडो रूपये गमावणे व कमावणे काही नवी बाब नाही. मात्र, आज एका सरकारी कंपनीची काही मिनिटांतच बाजी पलटली गेली. त्याचे कारण ठरले एक बातमी, ज्यामुळे कंपनीचे भागभांडवल तब्बल 700 कोटी रूपयांनी वाढले. कंपनीच्या गुंतवणूकदारांना याचा चांगलाच फायदा झालेला दिसला. 

 

सरकारने घेतला हा महत्त्वाचा निर्णय- 

 

खर तर मंगळवारी दुपारी 3 वाजता एक मोठी बातमी आली. ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, सरकारने बीईएमएलची 26 टक्के भागीदारी विकण्याच्या निर्णयाला अधिकृत मंजूरी दिली आहे. सध्या या कंपनीत सरकारची भागीदारी 54 टक्के आहे. या बातमीनंतर कंपनीच्या शेयरमध्ये जवळपास 15 टक्के वाढ झाली. ज्याचा फायदा कंपनीच्या शेयरमध्ये गुंतवणूक करणा-या गुंतवणूकदारांना झाला.

 

काही मिनिटांत 700 कोटींचे वाढले भागभांडवल- 

 

कंपनीचा शेयर वधारल्याने कंपनीला चांगलाच फायदा झाला. काही मिनिटांत कंपनीच्या एकून बाजारातील भागभांडवलात जवळपास 700 कोटी रुपयांची वाढ झाली. कंपनीचा शेयर मागील विक्रीसत्रातील क्लोजिंग प्राईस (1233 रूपये)च्या तुलनेत जवळपास 15 टक्के वधारला. ज्यामुळे कंपनीचे एकून भागभांडवल 5700 कोटी रूपयांच्या घरात गेले. त्याच्या काही मिनिटे आधी कंपनीचे एकून भागभांडवल 5000 कोटी रूपये होते. 

 

त्याआधी सकाळपासून बीईएमएलच्या शेयरमध्ये पडझड सुरू होती व शेयर नकारात्मक पातळीवर गेला होता. मात्र, सरकारने तिकडे निर्णय घेतला आणि काही मिनिटांत सगळा खेळ पालटला.

बातम्या आणखी आहेत...