आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पेनमध्ये क्रिएटिंग बेटर फ्यूचर थीमवर सुरू झाला जगातील सर्वात मोठा मोबाइल इव्हेंट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बार्सिलोना(स्पेन)- जगातील सर्वात मोठा मोबाइल इव्हेंट “मोबाइल वर्ल्ड काँग्रेस’ सोमवारपासून सुरू झाला. या वर्षाची थीम क्रिएटिंग बेटर फ्यूचर ठेवली आहे. १ मार्चपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमात प्रसिद्ध तंत्रज्ञान कंपन्या स्मार्टफोनची अद्ययावत व्हर्जन सादर करतील. यासाेबत आर्टिफिशियल इंटेलिजन्स डिव्हाइस, आयओटी व तंत्रज्ञानाची उत्पादने, सेवा व नवोन्मेष पाहावयास मिळेल. मोबाइल वर्ल्ड काँग्रेसला जीएसएमए मोबाइल वर्ल्ड काँग्रेसच्या धर्तीवर ओळखले जात आहे. जीएसएमए म्हणजे ग्लोबल सिस्टिम फॉर मोबाइल कम्युनिकेशन. 


ही युरोपची व्यापारी संघटना असून जगभरातील मोबाइल नेटवर्क ऑपरेटर्सचे प्रतिनिधित्व करते. १९८७ पासून संघटनेद्वारे या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. असे असले तरी कॉन्फरन्सआधीच सॅमसंग, नोकिया व हुवावेंनी उत्पादने लाँच केली.  


भारत फाइव्ह जीची तयारी सांगणार 

 या मेळ्यात भारत आपले अस्तित्व दाखवत आहे. यादरम्यान फाइव्ह जी सेवा व तंत्रज्ञानात मोठ्या भूमिकेबाबत सांगितले जाईल. दूरसंचार सचिव अरुणा सुंदरराजन यांनी सांगितले की, आम्ही फाइव्ह जी तंत्रज्ञानाचे रिसीव्हर  नव्हे तर कॉन्ट्रिब्युटरच्या रूपात स्थान निश्चित करू इच्छित आहोत. या मेळ्यात दूरसंचारमंत्री मनोज सिन्हा ९० जणांच्या शिष्टमंडळासह सहभागी झाले आहेत.  

 

फाइव्ह जी तंत्रज्ञान  
नवी पिढी फाइव्हजी वर अवलंबून असेल. ५ जीने वेगवान स्पीड मिळेल, डाटा ट्रान्सफरमध्येही कमी अवधी लागेल. ५ जी, ४ जी पर्याय स्वरूपात येणार नाहीत. त्याऐवजी एक वेगळ्या डिजिटल लाइफला आकार देईल.  

 

व्हीआर, एआय, ब्लॉकचेन
या उद्योगात व्हर्च्युअल रिअॅलिटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स व ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी वेगाने वाढत आहे. हे कंपन्यांना नवी उत्पादने आणण्यात मदत करेल. कंपन्या शक्तिशाली, उपयुक्त, लहान उत्पादने आणत आहे.  

 

कनेक्टेड मशीन  
५ जीपासून इंटरनेट ऑफ थिंग्जमध्ये नवीन संधी आहेत. व्होडाफोन व टेलेफोनिका अशी उत्पादन व सेवा देत आहेत ज्यामुळे कंपन्यांना प्रक्रिया डिजिटल करणे व कारखान्यांना इंटनेटने जोडण्यास मदत मिळेल. 

 

वुमन फॉर टेक  
मोबाइल-टेक उद्योगाच्या समानतेसाठी धोरणात्मक सत्रही आहे. उद्योगात महिलांना सशक्त करण्याबरोबर समान दर्जा देण्याविषयी कशा बदल करावा, हे कंपन्यांना सांगितले जाईल.  

 

भव्य नियोजन  

सॅमसंग : एस ९ व एस ९प्लस लाँच  - गॅलेक्सी एस ९ व गॅलेक्सी एस९प्लस स्मार्टफोन लाँच केले अाहेत. दोन्ही स्मार्टफोनमध्ये टॉप व बॉटम बेजललेस आहेत. इन्फिनिटी डिस्प्ले व इंटेलिजन्स स्कॅन सुविधा दिली आहे. मिडनाइड ब्लॅक, ग्रे, कोरल ब्ल्यू व लॅव्हेंडर पर्पल रंगात मिळेल. अनलॉकिंगचे अनेक फीचर्स दिले आहेत. विविध लाइट स्थितीनुसार स्वत:हून त्याअनुरूप होईल.  
नोकिया : ५ मोबाइल लाँच - नोकियाने ५ मोबाइल बाजारात आणले. नोकिया १, नोकिया ८, सिराको, ७ प्लस, ६ व ८८१९ आहेत. सिराको नवा फोन असून त्यात दोन्ही कॅमेरे एकाच वेळी वापरण्याची सुविधा मिळेल.  
हुवावे : पहिले बेजललेस नोटबुक- मेटबुक एक्स प्रो पहिले फुलव्ह्यू टचस्क्रीन नोटबुक अाहे. पहिला ५ जी कमर्शियल मोडेमही लाँच केला.

 

बातम्या आणखी आहेत...