आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बजाजची डिस्कव्हर 110 अन् 125 बाजारात;डबल एलईडी डे रनिंग लाइट हेडलॅम्प सारख्या सुविधा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 मुंबई- बजाज ऑटोने बुधवारी नवीन प्रीमियम एक्झिक्युटिव्ह डिस्कव्हर ११० आणि डिस्कव्हर १२५ बाजारात आणल्या. नव्या स्टायलिश लूक आणि दमदार प्रदर्शनात या दोन्ही बाइक्समध्ये आपआपल्या श्रेणीमध्ये पहिल्यांदाच डबल एलईडी डे रनिंग लाइट (डीआरएल) हेडलॅम्प सारख्या सुविधा आहेत.  


बजाज ऑटो लि. चे अध्यक्ष (मोटारसायकल) एरिक वास यांनी सांगितले की, बजाजने प्लॅटिना कॉम्फरटेक आणि सीटी १०० सोबतच १०० सीसी श्रेणीमध्ये महत्त्वाचे स्थान मिळवले आहे. १०० ते १२५ सीसी श्रेणीमध्ये ग्राहकांना चांगला अनुभव देऊन डिस्कव्हर १०० आणि १२५ मध्ये नवीन फीचर्स आहेत. 


अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याची इच्छा असणाऱ्यांना ही वाहने आकर्षित करेल. एलईडी डीआरएल हेडलॅम्प स्टायलिश लूकसह दूरपर्यंत क्लीअर व्हिजन बनवून सुरक्षा देतो. 
जास्त वाहतुकीत रोमांचक राइटचा अनुभव देण्यासाठी दोन्ही बाइक्समध्ये लॉन्ग स्ट्रोक इंजिन आहेत. दोन्ही अॅडव्हान्स फोर स्ट्रोक, एअर कूल्ड, डिजिटल स्पीडोमीटर आणि १६ टक्के जास्त लांब सस्पेन्शन आणि जास्त आरामदायी सिटे आहेत.


 डिस्कव्हर ११० ची किंमत ५०,४९६ रुपये आहे, तर डिस्कव्हर १२५ ड्रम आणि डिस्क व्हर्जन अनुक्रमे ५३,४९१ आणि ५६,३१४ (एक्स शोरूम महाराष्ट्र) रुपये आहे. या दोन्ही गाड्या ग्राहकांसाठी काळा, लाल आणि निळ्या रंगात उपलब्ध असतील.

बातम्या आणखी आहेत...