आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Global Debt Has Reached A Record High, IMF Says, And Three Countries Are To Blame

सावध ऐका पुढल्या हाका! जागतिक मंदी येतेय, जपान- अमेरिकेची अर्थव्यवस्था कोसळणार?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- जागतिक कर्ज 164 लाख कोटी डॉलर म्हणजे सुमारे 10,660 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. यामुळे संपूर्ण जगावरच आर्थिक मंदीचा धोका आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) याबाबत इशारा देताना म्हटले आहे की, जागतिक कर्जाची ही स्थिती इतकी भयंकर आहे की आर्थिक घडी विस्कटल्याने अनेक देशांना कर्ज फेडणेच कठीण होणार आहे. यामुळे जग भयंकर आर्थिक मंदीत लोटले जाऊ शकते. यामुळे ‘मंदी’बाईचा फेरा आला तर सावरणे कठीण होईल. जपान, चीन आणि अमेरिकासारखे विकसित देश यामुळे कोलमडून पडतील अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.  

 

आयएमएफ दर सहा महिन्यांनी वित्तीय पत अहवाल जाहीर करते. 18 एप्रिल रोजी याबाबत जाहीर झालेल्या अहवालानुसार, 2016 मध्ये जागतिक पातळीवर सरकारी व खासगी कर्ज वाढून ते 2017 मध्ये जागतिक जीडीपीच्या 225% झाले आहे. यापूर्वी ते 2009 मध्ये अशा उच्चांकी पातळीवर होते. 

 

आयएमएफनुसार जगात खासगी कर्ज वेगाने वाढत आहे. विशेषत: चीनमध्ये हे कर्ज अधिक आहे. गेल्या जागतिक मंदीनंतर जगात खासगी कर्ज जितके वाढले आहे त्यात एकट्या चीनचा वाटा तीन चतुर्थांश आहे. या कर्जांमुळे देशांच्या विकास दरावर गंभीर परिणाम होऊ शकतो. शिवाय, जागतिक अर्थव्यवस्थेलाही खीळ बसू शकते. मात्र, चीनवर त्यांच्या जीडीपीच्या तुलनेत जगात सर्वात कमी कर्ज आहे. 

 

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाच दिवसांपूर्वी जगाची अर्थव्यवस्था 2018 आणि 2019 मध्ये 3.9 टक्के या दराने वाढेल असा अंदाज व्यक्त केला होता, मात्र वाढत्या कर्जामुळे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होतील असे स्पष्ट केले होते. आयएमएफने प्रसिद्ध झालेल्या अहवालात थेट जागतिक आर्थिक मंदीचाच इशारा दिला आहे.
 
आयएमएफने काय म्हटले आहे?

 

– जगभरात सरकारी आणि खासगी कर्जाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. आज जगावर 164 लाख कोटी डॉलर्स (सुमारे 10660 लाख कोटी रुपये) इतके प्रचंड कर्ज आहे.
– 2011 पासून कर्जाचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. जागतिक जीडीपीच्या तुलनेत हे कर्ज 225 टक्के इतके आहे.
– 2009 मध्ये आलेल्या आर्थिक मंदीचा सर्वाधिक फटका महासत्ता अमेरिका आणि युरोपला बसला. त्याचा परिणाम जगभर झाला होता. 2009 च्या मंदीतून जग अद्याप पूर्णपणे सावरलेले नाही हेच स्पष्ट होते.
– चीनमध्ये खासगी क्षेत्रात वाढत्या कर्जामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
– आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक देशांनी तत्काळ पावले उचलली पाहिजेत, नाहीतर यावेळी आर्थिक मंदी आली तर त्याचा मुकाबला करणे कठीण होईल.
– अमेरिकेत आर्थिक मंदीचा मोठा फटका बसू शकतो. 2020 पर्यंत अमेरिकेची वित्तीय तूट एक लाख कोटी डॉलर्सपर्यंत जाऊ शकते.

 

देश                          जीडीपीच्या तुलनेत या देशावर एवढा आहे कर्जाचा बोजा
जपान                                       236 टक्के
इटली                                      132 टक्के
अमेरिका                                      108 टक्के
ब्राझील                                       84 टक्के
भारत                                      70. 2 टक्के
चीन                                      47.8 टक्के

 

बातम्या आणखी आहेत...