आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 ते 25 लाख रुपयांत खरेदी करू शकता प्‍लॉट आणि फ्लॅट, सरकारी बँक करत आहे लिलाव, दिल्‍लीसह या 3 राज्‍यांत आहे ऑप्‍शन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली - इंडियन ओव्‍हरसीज बँकेसह 3 बँकांनी कर्जाची परतफेड न केलेल्‍या ठेवीदारांच्‍या संपत्‍तीची लिलाव प्रक्रिया सूरू केली आहे. या बँका दिल्‍लीसह 3 राज्‍यांत प्‍लॉट आणि फ्लॅटचा ई-लिलाव करत आहे. यामध्‍ये कोणीही भाग घेऊ शकता. विशेष म्‍हणजे या प्रॉपर्टींची रिझर्व्‍ह प्राइज 10 ते 25 लाख रुपयांपर्यंत आहे. मात्र 10 टक्‍के अर्नेस्‍ट मनी डिपॉझिट करून कोणतीही व्‍यक्‍ती या लिलावामध्‍ये बोली लावू शकते.


दिल्‍लीत 16 लाखांत घर
इंडियन ओव्‍हरसीज बॅंकेद्वारा भोगल, जंगपूरा स्थित मौजा अलीगंजमध्‍ये एका घराचा लिलाव करण्‍यात येणार आहे. याची रिझर्व्‍ह प्राइज 16.60 लाख रुपये एवढी ठेवण्‍यात आली आहे. तुम्‍हाला कमीत कमी 50 हजार रुपयांपासून बोलीस सुरूवात करावी लागेल. अर्नेस्‍ट मनी डिपॉझिट 1 लाख 70 हजार रुपये आहे. या बोलीत भग घ्‍यायचा असेल तर 26 जुलैपर्यंत तुम्‍हाला आपला अर्ज सबमीट करावा लागेल. 27 जुलै रोजी दुपारी 11 ते 1 वाजेदरम्‍यान हा लिलाव होणार आहे. बोली लावण्‍यासाठी तुम्‍हाला http://iob.foreclosureindia.comया वेबसाईटवर अर्ज सबमीट करावा लागेल.


20 लाखांत दिल्‍लीत फ्लॅट
इंडियन ओव्‍हरसीज बँक दिल्‍लीतील नरेला येथील डीडीए फ्लॅटचा लिलाव करत आहे. सेक्‍अर बी-2 येथील या फ्लॅटची साईज 452 स्‍क्‍वेअर फुट आहे. याची रिझर्व्‍ह प्राइज 19.71 लाख रुपये ठेवण्‍यात आली आहे. 27 जुलैरोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेदरम्‍यान या प्रॉपर्टीची बोली लागणार आहे. बोलीत सहभागी होण्‍यासाठी तुम्‍हाला 26 जुलैरोजी संध्‍याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करावा लागेल. तुम्‍ही  http://wwe.iob.in/e-auctions.aspx या वेबसाईटवर अर्ज सबमीट करू शकता.

 

दिल्‍लीत 22.50 लाख रुपयांत 84 यार्डचा प्‍लॉट
डेट रिकव्‍हरी ट्रिब्‍यूनल, दिल्‍लीतील कैलास पुरी येथील नसीरपूर गावात जवळपास 83.61 स्‍क्‍वेअर फुटच्‍या प्‍लॉटचा लिलाव होत आहे. 22.50 लाख रूपये ऐवढी याची रिझर्व्‍ह प्राइज ठेवण्‍यात आली आहे. 13 ऑगस्‍ट रोजी दुपारी 3 ते 4 दरम्‍यान याचा लिलाव होणार आहे. 10 ऑगस्‍टपर्यंत तुम्‍ही बोलीचा अर्ज सबमीट करू शकता. अर्ज https://bankauctions.in/listing-details/land-at-revenue-estate-of-village-nasirpur-kailashpuri-new-delhi/ या लिंकवर सबमीट करा.


पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, 11 लाखांत कुठे मिळत आहे प्‍लॉट...

 

बातम्या आणखी आहेत...