आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्च तिमाहीमध्ये एचडीएफसी बँकेचा नफा 20.3% वाढून पोहोचला 4,799.3 कोटींवर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- एचडीएफसी बँकेला मागील आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या चौथ्या तिमाहीमध्ये ४,७९९.३ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. जानेवारी ते मार्च २०१७ च्या तिमाहीच्या तुलनेत हा नफा २०.३ टक्के जास्त आहे. बँकेचे चौथ्या तिमाहीमधील एकूण उत्पन्न १८.५ टक्क्यांनी वाढून २५,५४९.७ कोटी रुपये झाले आहे.

 

एक वर्षापूर्वी समान तिमाहीमध्ये २१,५६०.७ कोटी रुपये नफा झाला होता. बँकेच्या संचालक मंडळाने शेअरधारकांना ३१ मार्च २०१८ रोजी संपलेल्या वर्षासाठी दोन रुपयांचे दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक इक्विटी शेअरवर १३ रुपये (५५० टक्के) लाभांश देण्याची शिफारस केली आहे. या आधीच्या आर्थिक वर्षात बँकेने दोन रुपये फेस व्हॅल्यूच्या प्रत्येक इक्विटी शेअरवर ११ रुपये लाभांश दिला होता. त्याचबरोबर बँकेच्या संचालक मंडळाने पुढील १२ महिन्यांत पर्पेच्युअल डेट इन्स्ट्रुमेंट्स, प्रायव्हेट प्लेसमेंटअंतर्गत जारी करत ५०,००० कोटी रुपये जमा करण्यास मंजुरी दिली अाहे. आता बँक या दोन्ही निर्णयांवर पुढील सर्वसाधारण सभेत (एमजीएम) शेअरधारकांची मंजुरी घेणार आहे. 

 

देशातील सर्वात मूल्यवान बँक  

मुंबई शेअर बाजारात एचडीएफसी बँकेचा मार्केट कॅप ५,०८,८८४.२३ कोटी रुपये राहिला. मार्केट कॅपच्या दृष्टीने अव्वल - ३ कंपन्यांच्या यादीत टीसीएस व रिलायन्स इंडस्ट्रीज नंतर बँक तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर २,१९,९९७.५९ कोटींच्या मार्केट कॅपसह कोटक महिंद्रा बँक १० व्या व २,१५,४३९.५४ कोटींसह एसबीआय ११ व्या क्रमांकावर आहे.

 

पूर्ण आर्थिक वर्षात एकत्रित नफ्यात २१.४ टक्क्यांची वाढ 
३१ मार्च २०१८ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेला १८,५१० कोटी रुपयांचा एकत्रित नफा झाला आहे. याआधीच्या आर्थिक वर्षात झालेल्या नफ्याच्या तुलनेत हा आकडा २१.४ टक्के जास्त आहे, तर कन्सोलिडेटेड अॅडव्हान्सेसचा विचार केल्यास ३१ मार्च २०१८ रोजी संपलेल्या वर्षात हा आकडा १९.६ टक्क्यांनी वाढून ७,०००,०३४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. याआधीच्या आर्थिक वर्षात हा ५,८५,४८१ कोटी रुपयांचा होता. याचा ग्रॉस एनपीए १.३० टक्के नोंदवण्यात आला. हा ३१ मार्च २०१७ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात १.०५ टक्के होता, तर ३१ मार्च २०१८ रोजी बँकेचा नेट एनपीए ०.४ 
टक्के राहिला.

बातम्या आणखी आहेत...