आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिझर्व्ह बॅंक मार्च महिन्यात देशातील बॅंकांना देणार 1 लाख कोटी रुपये, अशी आहे योजना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भारतीय रिझर्व्ह बॅंक (आरबीआय) मार्च महिन्यात देशातील बॅंकांना 1 लाख कोटी रुपयांचे अतिरिक्‍त खेळते भांडवल (लिक्विडिटी) उपलब्‍ध करून देणार आहे.

 

RBI नुसार, आर्थिक वर्षाचे क्‍लोजिंग करताना बॅंकाना पैशाची निकड भासते. ही निकड लक्षात घेऊन RBI लॉन्‍ग टर्म इंस्‍ट्रूमेंटचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

LAFच्या माध्यमातून मिळेल ही सुविधा
RBI लिक्विडिटी अॅडजेस्‍टमेंट फॅसिलिटीच्या (LAF) माध्यमातून ही सुविधा उपलब्‍ध करून देण्यात येणार आहे. RBI नुसार, बॅकिंग क्षेत्रातील सद्यस्थिती लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी RBI 1 लाख कोटी चार टप्प्यात उपलब्ध करून देणार आहे.

 

बॅंकांना मिळेल अर्थसाह्य
इकराचे कार्तिक श्रीनिवासन यांनी सांगितले की, बॅंकाना मार्च महिन्यांत अर्थसाह्य उपलब्ध करून देण्याचा आरबीआयने निर्णय घेतला आहे. मार्च 2018 नंतरही हा पैसा सिस्टिममध्ये काय ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बातम्या आणखी आहेत...