आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेमध्ये झालेल्या करबचतीने इन्फोसिसच्या नफ्यात 38.3% वाढ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू- देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसला डिसेंबर २०१७ तिमाहीमध्ये ५,१२९ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. ऑक्टोबर - डिसेंबर २०१६ मध्ये झालेल्या नफ्याच्या तुलनेत हा नफा ३८.३ टक्के जास्त आहे. सप्टेंबर २०१७ तिमाहीच्या तुलनेत यामध्ये ३७.६ टक्क्यांची वाढ झाली आहे. अमेरिकेमध्ये करबचत झाल्यामुळे नफ्यातील ही वाढ नोंदवण्यात आली आहे. १,४३२ कोटी रुपयांच्या रकमेला “रिव्हर्स’ करून नफ्यात जोडण्यात आले आहे. हा नफा कमी केल्यास तर नफा केवळ ३,६९७ कोटी रुपयांचा झाला आहे. हा नफा डिसेंबर २०१६ आणि सप्टेंबर २०१७ या दोन्हींच्या तुलनेत कमी आहे.  

 

कंपनीच्या एकूण महसुलात तीन टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. महसूल १७,२७३ कोटींनी वाढून १७,७९४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीने पूर्ण वर्षभरातील महसूल वाढीचा अंदाज ५.५ ते ६.५ टक्क्यांवर कायम ठेवला आहे. टीसीएसनेही गुरुवारी ३.९ टक्के वाढीची घोषणा केली होती.  नवीन सीईओ सलील पारेख आल्यानंतर इन्फोसिसचा हा पहिला तिमाही निकाल आहे. दोन जानेवारी राेजी सीईओ तसेच व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार घेतल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच पत्रकारांशी झालेल्या चर्चेत धोरणाची समीक्षा सुरू असल्याचे सांगितले. एप्रिल महिन्यापर्यंत याची घोषणा होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. या दरम्यान ग्राहक, भागीदार, कर्मचारी आणि कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटणार असल्याचे ते म्हणाले. कंपनीचे अध्यक्ष के. मूर्ती यांनी खासगी कारणामुळे राजीनामा दिला असल्याचेही कंपनीने सांगितले. ते ३१ जानेवारीपर्यंतच या पदावर राहणार आहेत. 

 

 करात बचत 
इन्फोसिसने मागील महिन्यात अमेरिकी प्रशासनाच्या “इंटर्नल रेव्हेन्यू सर्व्हिस डिपार्टमेंट’ सोबत “अॅडव्हान्स प्राइसिंग’ करार केला आहे. यासंबंधी २०१५ पासून चर्च सुरू होती. हा करार २०११ ते २०२१ दरम्यानचा आहे. या अंतर्गत महसूल मोजणी करण्याच्या पद्धतीत काही बदल झाले आहे. कर दरातही एक टक्क्यांची कपात झाली आहे. यामुळे कंपनीच्या २०११ पासूनच्या आतापर्यंतच्या करात १,४३२ कोटी रुपयांची बचत होईल. कंपनीने या रकमेला ‘रिव्हर्स’ करून खात्यात दाखवले आहे. 

 

मुंबई : टीसीएसचा १२,७०० कोटींचा सामंजस्य करार

 देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसने अमेरिकी विमा कंपनी ट्रान्समेरिकासोबत दोन अब्ज डॉलर (१२,७०० कोटी रुपये) चा करार केला आहे. या अंतर्गत टीसीएस ट्रान्समेरिका कंपनीसाठी थर्ड पार्ट अॅडमिनिस्ट्रेटर (टीपीए)चे काम करेल. कंपनीला एक कोटीपेक्षा जास्त विम्याला इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्मवर आणण्याची जबाबदारी मिळाली आहे. १०० वर्षांपेक्षा जास्त जुनी असलेली ट्रान्समेरिका ही नेदरलँड्सच्या एगॉन समूहाची कंपनी आहे. विशेष म्हणजे एक दिवस आधीच टीसीएसने डिसेंबर तिमाहीमध्ये नफ्यात ३.६ टक्के वाढ झाल्याची घोषणा केली होती. ऑक्टोबर - डिसेंबर दरम्यान कंपनीला ६,५३१ कोटी रुपयांचा नफा झाला होता. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा,  महसूल १७,२७३ वरून वाढून १७,७९४ कोटी रुपयांवर ...

बातम्या आणखी आहेत...