आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Mallya म्हणाले-दिवस, वेळ आणि जागा सांगा, मी स्वतः संपूर्ण मालमत्ता देतो, बेघर व्हायला घाबरत नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दि‍ल्‍ली - विजय माल्यांनी म्हटले आहे की, ब्रिटनमध्ये असलेली संपत्ती जप्त करण्यासाठी अधिकारी आणि कोर्टाच्या आदेशाते पालन करणार आहे. पण अधिकाऱ्यांना फार काही मिळणार नाही. त्याचे कारण म्हणजे त्यांच्या कुटुंबाचे आलिशान घर त्यांच्या नावावर नाही. माल्याला संपत्ती सादर करण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. माल्याने अंमलबजावणी अधिकाऱ्यांना असेही म्हटले की, तुम्ही घरी येऊन संपत्ती जप्त करायची गरज नाही, मी स्वतः तुम्हाला देतो. मला फक्त वेळ, दिवस आणि जागा सांगा. 

 

ब्रि‍टि‍श फॉर्म्युला वन ग्रांपिमध्ये आलेले माल्या म्हणाले, मी माझ्या नावावरील ब्रिटनमधील मालमत्ता द्यायला तयार आहे. पण लक्झरी घर त्यांच्या मुलांच्या नावावर तर लंडनचे घर आईच्या नावावर आहे. त्यामुळे त्यांना काही फरक पडणार नाही. जप्त केल्या जाणाऱ्या संपत्तीमध्ये काही कार, दागिने आणि इतर काही बाबी आहेत. कोर्टात सांगितलेल्या गोष्टींच्या पुढे अधिकारी जाऊ शकत नाहीत. घर माझ्या नावावर नाही, त्यामुळे प्रश्नच नाही, असेही ते म्हणाले. 


माल्‍या यांनी मार्च 2016 मध्ये भारत सोडला होता तेव्हापासून ते ब्रिटनमध्ये आहेत. त्यांचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे त्याला प्रवास करता येत नाही. तेव्हापासून माल्या फक्त ब्रिटिश ग्रांपिमध्येच दिसतात. माल्याने म्हटले 200 कोटी डॉलरची गुंतवणूक असलेल्या मालमत्ता कर्नाटक हायकोर्टासमोर सादर केल्या होत्या. त्या बँक आणि इतरांच्या फेडीसाठी पुरेसे आहे, मग इतर संपत्ती जप्त करण्याचा प्रश्नच नाही. 

बातम्या आणखी आहेत...