आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारुती सुझुकीची ‘सुपर कॅरी’ गाडी ‘कमर्शियल व्हेइकल ऑफ द इयर’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -  नुकत्याच पार पडलेल्या २०१७ साठीच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात मारुती सुझुकीच्या सुपर कॅरी लाइट कमर्शियल गाडीला “एससीव्ही ऑफ द इयर’ तसेच “कमर्शियल व्हेइकल ऑफ द इयर’ हे दाेन पुरस्कार मिळाले आहेत. हे पुरस्कार मारुती सुझुकीचे उपाध्यक्ष एम. एस. चॅनल राम सुरेश अकेला तसेच व्यवस्थापकीय संचालक (कमर्शियल अँड रुरल मार्केटिंग) अरुण अरोरा यांनी स्वीकारले.  


एका नवागताला उद्योगातील तज्ज्ञांकडून प्रतिष्ठा दिली जात असल्याचा अानंद असून त्यामुळे आम्हाला भारताच्या व्यापारी गरजांनुसार उत्पादनात नावीन्य आणण्याची प्रेरणा मिळत असल्याचे या वेळी अकेला यांनी सांगितले.  मारुती सुझुकीने कॅरी या पहिल्या मिनीट्रकसह व्यावसायिक वाहनांच्या श्रेणीमध्ये पदार्पण केले आहे. चालू वर्षात मारुती सुझुकीने ७३०० सुपर कॅरी वाहनांची विक्री केली असून मिनीट्रकच्या श्रेणीत हा वाटा सहा टक्के आहे. विशेषकरून वाहतूकदार, ग्राहकोपयोगी वस्तूंचे वितरक, पाणी व दूध विक्रेते, भाजीपाला विक्रेते, फिरते जाहिरातदार, खाद्यपेय विक्रेते आदींनी या वाहनाला पसंती दिली आहे. ग्राहकांना शक्ती, पिकअप, मायलेज विशेषत्वाने आवडले असल्याचेही त्यांनी सांगितले. या मारुती सुझुकीचे देशभर पसरलेले विशाल सर्व्हिस नेटवर्क ज्यात ३३०० हून अधिक वर्कशॉप्स सर्वात महत्त्वाचे कारण आहे. सुपर कॅरी सीएनजी व डिझेल प्रकरणात देशभरातील १७५ वितरकांकडे उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...