आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटी कौन्सिलची उद्या बैठक, 75 वस्तू-सेवांचा कर होणार कमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जीएसटी कौन्सिलची २४ वी बैठक १८ जानेवारीला होत आहे. अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या बैठकीत सुमारे २५ वस्तू आणि ५० सेवांवरील करांचे दर कमी हाेण्याची शक्यता आहे. सिंचनाच्या काही उपकरांवरील जीएसटी दर १८% वरून १२% केला जाऊ शकतो. 


यापूर्वी १० नोव्हेंबरला २११ वस्तूंवरील करांचे दर कमी केले होते. रिअल इस्टेट क्षेत्राला जीएसटीच्या कक्षेत आणण्यावरही गुरुवारीही चर्चा होऊ शकतो. लॉ रिव्ह्यू कमिटीच्या शिफारशींवरही कौन्सिल विचार करेल. या कमिटीचा नियम अधिक सोपे करण्यावर भर आहे. यात नोंदणी, रिटर्न दाखल व टॅक्स क्रेडिटचा दावा करण्यासंबंधींच्या नियमांचा समावेश आहे. जीएसटी कमी केल्यापासून करवसूलीही कमी झाली आहे. जुलैमध्ये ९४,०६३ कोटी रुपये जीएसटी मिळाला हाेता. तो नोव्हेंबरमध्ये फक्त ८०,८०८ कोटी होता.

बातम्या आणखी आहेत...