आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोस्टातील बचतीवर मे पासून मिळेल जास्त व्याज, वापरा ही ट्रिक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जर तुमचे पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असेल तर तुम्हाला मे महिन्यात दीड टक्के जास्त व्याज मिळू शकते. सध्या पोस्ट ऑफिसमध्ये बचत खात्यावर 4 टक्के व्याज मिळते. जास्त व्याजाचा लाभ तुम्हाला एप्रिलपासून सुरु होणाऱ्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेअंतर्गत (IPPB) मिळू शकतो. त्यासाठी तुम्हाला तुमचे सध्याचे पोस्ट ऑफिसमधील खाते पेमेंटस बॅंक खात्याशी लिंक करावे लागेल.

 

 

इंडिया पोस्ट पेमेंटस बॅंकेशी पोस्ट ऑफिसमधील बचत खात्याशी जोडणी मे मध्ये सुरु होईल. पेमेंट बँकेतील बचत खात्यावर तुम्हाला 5.5 टक्के व्याज मिळेल. तर पोस्ट ऑफिसमधील बचत खात्यावर 4 टक्के व्याज मिळत आहे. जोडणी सुरु झाल्यावर जे बचत खाते पोस्ट ऑफिसमधील पेमेंट्स बॅंकेत हस्तांतरित होतील त्यांना दीड टक्के अधिक व्याज मिळेल. 

 

 

तुमच्या संमतीशिवाय नाही लिंक होणार अकाऊंट
सुत्रांनी सांगितले की, पोस्ट ऑफिसमधील बचत खातेधारकांना डिजिटल बँकिंगची सुविधा त्यांच्या संमतीनंतरच मिळेल. म्हणजेच ही एक वैकल्पिक सेवा आहे. खातेधारकाला ही सेवा हवी असल्यासच त्याचे अकाऊंट IPPB शी लिंक करण्यात येईल.

 

 

पुढे वाचा: किती ग्राहकांना होईल फायदा...

बातम्या आणखी आहेत...