आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुक तुम्हाला देईल 26 लाख रुपये, फक्त तुम्हाला द्यावी लागेल ही सूचना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- माहितीचा चुकीचा वापर केल्याने जगभरात नाचक्की सहन करावी लागत असलेल्या फेसबुकने आता नव्या उपायांची घोषणा केली आहे. फेसबुकने सगळ्या पध्दतीच्या बदलानंतर आता अशा लोकांना बक्षीस देण्याची घोषणा केली  आहे जे डाटाचा अयोग्य वापर होत असल्याची माहिती देतील. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी याबाबतची घोषणा केली आहे. 

 


कंपनीने म्हटले आहे की, ते अशा लोकांना बक्षीस देतील जे फेसबुकला सांगतील की कोणते अॅप त्यांच्याकडे असलेली माहिती थर्ड पार्टीला विकत आहेत. अशी माहिती देणाऱ्यास कंपनी 500 डॉलर ते 40 हजार डॉलरचे बक्षीस देईल. याची भारतीय रुपयांमध्ये किंमत जवळपास 26 लाख रुपये होते. कंपनीने असेही म्हटले आहे की ही रक्कम 40 हजार डॉलरपेक्षा अधिकही असू शकते. 

 

 

पुढे वाचा: अमेरिकेतील संसदेत फेसबुकने मांडली काय भूमिका

बातम्या आणखी आहेत...