आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 162 अंकाने वधारला, निफ्टी 10,350 पार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- शेअर बाजारात सलग तिसऱ्या सत्रात वाढ नोंदवण्यात आली. आज (सोमवार) दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 161.57 अंशांनी वधारून 33 हजार 788 अंशांवर व्यवहार करत बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 47.75 अंशांची वाढ नोंदवण्यात आली. निफ्टी 10 हजार 379 अंशांवर व्यवहार करत स्थिरावला. 

 


येत्या आठवड्यात काही दिग्गज कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार आहेत. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेली इन्फोसिस येत्या आठवड्यात जानेवारी ते मार्च कालावधीचे तिमाही निकाल जाहीर करणार आहे.  कंपन्यांचे निकाल सकारात्मक राहण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.  गुंतवणूकदारांमध्ये आज खरेदीचा उत्साह दिसून आला. क्षेत्रीय पातळीवर  बँकिंग, एफएमसीजी, कंझ्युमर ड्यूरेबल्स, कॅपिटल गुड्स आणि ऑईल अँड गॅस कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरु होती. मात्र आयटी आणि फार्मा कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण बघायला मिळाली. 

बातम्या आणखी आहेत...