आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा सरकारी अर्ज भरताना राहा सावधान, कळतील तुमचे आर्थिक व्यवहार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जर तुम्हाला आर्थिक व्यवहार (ट्रान्झॅकशन) करायचा असेल तर तुमच्याकडे पॅन असणे गरजेचे आहे. पण तुमच्याकडे पॅन नंबर नसेल तर तुम्ही एक अर्ज भरता हा अर्ज म्हणजेच फॉर्म 60 असतो. तुम्ही फॉर्म 60 भरुन व्यवहार करता पण तुम्ही एका आर्थिक वर्षात एकापेक्षा अधिक ट्रान्झॅकशन करत असाल आणि त्यासाठी तुम्हाला फॉर्म 60 भरण्याची गरज पडली असेल तर तुमच्या सारी आर्थिक व्यवहारांची माहिती सरकारपर्यंत पोहचत आहे.

 

 

 

फॉर्म 60 ही सुविधा अशा व्यक्तींसाठी आहे ज्याचे वार्षिक उत्पन्न टॅक्समधून सुट मिळवण्यासाठी असणाऱ्या उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा कमी म्हणजेच अडीच लाखापेक्षा कमी आहे. जर तुमचे उत्पन्न यापेक्षा जास्त असेल आणि तु्म्ही फॉर्म 60 भरत असाल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. इन्कम टॅक्स विभाग यासाठी तुम्हाला नोटीस पाठवू शकतो. जर तपासात सापडले की तुम्ही चुकीच्या पध्दतीने फॉर्म 60 भरत आहात आणि टॅक्स चोरी करत आहात तर तुमच्याविरोधात खटलाही दाखल होऊ शकतो. 

 

 

सरकारजवळ असेल तुमच्या व्यवहारांची माहिती
चार्टर्ड अकाउटंट (सीए) संगीत गुप्ता यांनी सांगितले की, इन्कम टॅक्स विभागाने जारी केलेल्या नोटफिकेशन अनुसार जर कोणाकडे पॅन नाही पण ट्रान्झॅकशन करत आहे तर त्या व्यक्तीने पॅन नंबर टाकणे गरजेचे आहे. त्याला फॉर्म 60 जमा करावा लागेल. त्याला फॉर्म 60 मध्ये व्यवहाराची पूर्ण माहिती द्यावी लागेल. एक व्यक्ती एका आर्थिक वर्षात अनेक वेळा फॉर्म 60 भरत असेल तर त्या व्यक्तीला सगळ्या डिटेल्स सरकारला द्यावा लागतील. 

 

 

इलेक्ट्रॉनिक फॉरर्मटमध्ये जमा करु शकता फॉर्म 60
- आता इन्कम टॅक्स विभागाने इलेक्ट्रॉनिक फॉरर्मटमध्ये फॉर्म 60 करण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन दिली आहे. यासाठी सरकारने एक पोर्टल बनवले आहे. जर कोणी इलेक्‍ट्रॉनिक स्वरुपात फॉर्म 60 सबमिच केला तर त्याच्या मोबाईल नंबरवर किंवा ईमेलवर वन टाईम पासवर्ड येईल. ओटीपीद्वारे तो याला व्हेरीफाय करु शकतो. याशिवाय फिंगर प्रिटद्वारे आधार द्वारे पडताळणी करता येणार आहे. जर कुठे इलेक्‍ट्रॉनिक पध्दतीने फॉर्म 60 जमा करण्याची सुविधा नसेल तर तुम्ही नियमित पध्दतीनेही फॉर्म 60 भरु शकता.

 

 

सरकार विचारेल प्रश्न
सीए संगीत गुप्ता म्हणले अशा लोकांच्या देवाण-घेवाणीची चौकशी करता येत नव्हती ज्यांच्याकडे पॅन नंबर नाही. पण आता फॉर्म 60 द्वारे एकापेक्षा अधिक वेळा व्यवहार करणारे सरकारच्या नजरेत येणार आहेत. सरकार याबाबत विचारणा करु शकते. कर चुकवेगिरीला यामुळे आळा बसणार आहे.  

 

 

पुढे वाचा: फॉर्म 60 चा असा होत आहे गैरवापर

बातम्या आणखी आहेत...