आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • MON STA MAHR UTLT Salman Khan Granted Bail By Jodhpur Court In Blackbuckpoachingcase

सलमानला जामीन मिळाल्याने बॉलीवुडला दिलासा, वाचणार 600 कोटी रुपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर सत्र न्यायालयाने अभिनेता सलमान खानला जामीन दिला आहे. ते आता तुरुंगातून बाहेर येणार असल्याने बॉलीवूडच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांना दिलासा मिळाला आहे. सलमान खानच्या चित्रपट आणि जाहिरातींशिवाय छोट्या पडद्यावरील सुमारे 600 कोटी रुपये त्याच्यावर लागले आहेत. त्याला जामीन मिळाल्याने हे पैसे गुंतवणाऱ्या सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.

 

 

कोणते चित्रपट होते लटकले


रेस 3
रेस 3 चे शूटिंग पूर्ण झाले असून केवळ डबिंगचे काम राहिले आहे. रेस सिरीजच्या या तिसऱ्या चित्रपटात पहिल्यादाच सलमानचे नाव जोडले गेले आहे. या चित्रपटावर जवळपास 125 ते 150 कोटी रुपये खर्च झाले आहेत. अशा रितीने सलमानला शिक्षा झाल्याने या सगळ्याच्या मनात आता कायद्याची चांगलीच भिती बसली असेल. चित्रपट समीक्षक कोमल नहाटा यांनी म्हटले आहे की, चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यावर 400 कोटीपेक्षा अधिकची कमाई होईल अशी भविष्यवाणी वर्तविण्यात आली होती.

 

 

किक 2
यश फिल्म सलमानचा चित्रपट किकचा दुसरा भाग आहे. अजुनपर्यंत या चित्रपटाच्या शुटिंगचा दुसरा भाग अजून सुरु झालेला नाही. पण सगळे नियोजन झालेले आहे. ट्रेड अॅनालिस्ट गिरीश वानखेडेंच्या म्हणण्यानुसार, सलमानच्या जेलमध्ये जाण्यामुले या चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांचे 200 कोटी रुपये बुडाले आहेत.

 

 

दबंग 3 आणि भारत
दबंग 3 हा सलमानचा स्वत:चा चित्रपट आहे. याचे दोन भाग हिट झाले होते. एक आणखी चित्रपट भारतबाबतही शंका निर्माण झाली होती. 

 

 

टीव्हीलाही बसला होता फटका
- सलमान तुरुंगात गेल्याने छोट्या पडद्याला धक्का बसला. त्याचा शो दस का दम सुरु होणार आहे. यासाठी सलमानने मोठी फीसही आकारली होती. एका रिपोर्टनुसार सलमानला 26 एपिसोडसाठी 78 कोटी रुपये मिळणार आहेत. या हिशोबाने सलमान एका एपिसोडसाठी 3 कोटी रुपये आकारत आहेत. 

 

 

पुढे वाचा: आणखी काही माहिती

बातम्या आणखी आहेत...