आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात रोजगार वाढ मंदावल्याने आेईसीडीने व्यक्त केली चिंता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस - जगभरातील इतर देशांच्या तुलनेत भारताचा जीडीपी दर सर्वाधिक वेगाने वाढत असला तरी भारतातील रोजगार वाढीच्या दरात घसरण होत असून हा चिंतेचा विषय असल्याचे मत आर्थिक सहयोग आणि विकास संघटनेने (आेईसीडी) व्यक्त केले आहे. आयसीडीच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या “गोइंग फॉर ग्रोथ २०१८’ या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे. ओईसीडीत जगभरातील ३५ सदस्य देश आहेत.

 

अहवालातील सूचना  
- सर्वसमावेशक विकासासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याला प्राथमिकता द्यावी लागेल.  
- त्यासाठी कामगार कायद्याला अधिक सुलभ आणि आधुनिक बनवले गेले पाहिजे.  
- माध्यमिक शिक्षणाचा प्रचार अन् प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याची आवश्यकता.  
- लोकांना रोजगारासाठी पात्र करेल अशी प्रशिक्षण प्रणाली विकसित व्हायला हवी.

 

अमेरिकी विधेयकामुळे भारतीयांवर रोजगाराचे संकट

अमेरिकी संसदेत एक विधेयक सादर करण्यात आले आहे. हे विधेयक मंजूर झाले आणि अमलात आले तर भारतासारख्या देशात कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्यांच्या रोजगारावर संकट येण्याची शक्यता आहे. या विधेयकात करण्यात आलेल्या तरतुदीनुसार कॉल सेंटर कर्मचाऱ्याला अमेरिकी ग्राहकांना स्वत:चे लोकेशन सांगावे लागणार आहे. त्याचबरोबर अमेरिकी ग्राहकाने इच्छा व्यक्त केली तर त्या ग्राहकाचा कॉल अमेरिकेतील सेवा देणाऱ्यास हस्तांतरित करावी लागेल. हे नवीन विधेयक अमेरिकेतील ओहियो राज्यातील खासदार शेरड ब्राऊन यांनी संसदेत मोडले आहे. कॉल सेंटरमधील रोजगार आऊटसोर्स करणाऱ्या कंपन्यांची यादी जाहीर करण्याची तरतूदही या विधेयकात करण्यात आली आहे. ज्या कंपन्या असे रोजगार आऊटसोर्स करणार नाहीत, अशा कंपन्यांना फेडरल करारात प्राधान्य देण्यात येईल.  


१.८२ लाख कोटींचे उत्पन्न  : बिझनेस प्रोसेस व्यवस्थापन उद्योगात भारत जगातील प्रमुख देशांमधील एक आहे. आयटी उद्योगातील सर्वात मोठी संस्था नॅसकॉमनुसार भारताला दरवर्षी या माध्यमातून १.८२ लाख कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. यात अमेरिकी बाजाराचे सर्वाधिक योगदान आहे.

बातम्या आणखी आहेत...