आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीरवची अमेरिकी कंपनी फायरस्टार डायमंड इंकच्या खरेदीसाठी अनेक इच्छुक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क/नवी दिल्ली- हिरे व्यापारी नीरव मोदी याची अमेरिकेतील कंपनी फायरस्टार डायमंड इंकच्या खरेदीसाठी अनेक खरेदीदारांनी इच्छा व्यक्त केली आहे. कंपनीने २६ फेब्रुवारी रोजी न्यूयॉर्कमधील न्यायालयात दिवाळखोरी संबंधित याचिका दाखल केली होती. आता अनेक खरेदीदार इच्छुक असल्याची माहिती बुधवारी कंपनीने न्यायालयाला दिली आहे. फायरस्टार डायमंडची वार्षिक विक्री ६०० कोटी रुपयांच्या जवळपास असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. 

 
भारतात १२,७१७ कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या  प्रकरणात तपास संस्थांनी नीरव मोदी आणि त्याचे मामा मेहूल चौकशी याची ७,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये हिरे आणि दागिन्यांचाही समावेश आहे. त्यांच्या विरोधात करण्यात आलेल्या या तक्रारीमध्ये अमेरिकी कंपनीचे नाव नाही. पैसा आणि पुरवठादाराची अडचण वाढल्यामुळे कंपनी व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी समर्थ नसल्याची माहिती फायरस्टारने अमेरिकी न्यायालयाला दिली आहे. भारतात जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये दागिने तयार होत असलेल्या कंपन्यांचाही समावेश आहे.  


अमेरिकी कंपनीच्या नावात तीनदा बदल 

नीरव मोदीने अमेरिकी कंपनीचे नाव अनेक वेळा बदलले आहे. २००४ मध्ये या कंपनीची स्थापना करताना कंपनीचे नाव “ज्वेलरी सोल्युशन्स इंटरनॅशनल’ असे होते. वर्षभरानंतर या नावात बदल करून “नेक्स्ट डायमंड इंक’ करण्यात आले हाेते. त्यानंतर २००५ मध्ये फायरस्टोन नाव देण्यात आले. अखेर २०११ मध्ये तिसऱ्यांदा कंपनीचे नाव बदलून “फायरस्टार डायमंड’ करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...