आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्स 35 हजारांपार,मार्केट कॅपही 155 लाख कोटींवर;वर्षभरात 28.80% सेन्सेक्स वधारला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सेन्सेक्सने बुधवारी ३५ हजारांचा अभूतपूर्व उच्चांक गाठला. ३० शेअर्सचा हा निर्देशांक ३१०.७७ अंकांच्या वाढीसह ३५,०८१.८२ अंकांवर बंद झाला. दिवसभरात तो ३५,११८.५१ अंकांवर पोहोचला होता. यापूर्वी १५ जानेवारीला सेन्सेक्स ३४,८४३.५१ अंकांवर बंद झाला होता. निफ्टी ८८.१९ अंकांनी वधारून १०,७५१.५५ अंकांवर बंद झाला. दिवसभरात तो १०,८०३ अंकांवर पोहोचला होता. सोबतच बीएसई लिस्टेड कंपन्या एकाच दिवसात ९१,७३४ कोटींनी श्रीमंत झाल्या. बीएसईचे  मार्केट कॅपिटल आता १५४.८८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. 


वर्षभरात सेन्सेक्स २८.८०% वधारला आहे. जगभरातील प्रमुख बाजारांत ही तिसरी सर्वाेत्तम कामगिरी आहे. हाँगकाँगचा हँगसेंग एका वर्षात ४०.०३% आणि अमेरिकेच्या डाऊ जोन्समध्ये ३०.०९% वाढ झाली आहे. सेन्सेक्स २६ डिसेंबरला २०१७ ला ३४ हजारांवर गेला होता. ३५ हजारांपर्यंत जाण्यासाठी त्याला केवळ सोळाच कार्यालयीन दिवस लागले.

 

तेजीचे मुख्य कारण … 
उधारी ३० हजार कोटींनी कमी करण्याची सरकारची घोषणा या तेजीचे मुख्य कारण राहिली. यामुळे सरकारी रोख्यांत व्याजातून बँकांची कमाई वाढेल. सेन्सेक्समध्ये सर्वािधक वाढ नोंदवणाऱ्या ५ शेअरपैकी ४ बँकांचे आहेत. बीएसई बँकिंग इंडेक्स सर्वाधिक ४५५ म्हणजेच १.५५% वधारला. आयटी क्षेत्रातही १.२८% वाढ झाली.

 

ट्विटनंतर बदलला बाजाराचा कल
महसूल व खर्चांकडे बघता केंद्राने अतिरिक्त भांडवल उभारणीवर पुनर्विचार केला आहे. आता बाजारातून ५० हजार कोटींऐवजी फक्त २० हजार कोटी रुपये अतिरिक्त उभारले जातील.

- सकाळी ९.३२ वा. आर्थिक प्रकरणांचे सचिव सुभाषचंद्र गर्ग यांचे ट्विट.

बातम्या आणखी आहेत...