आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टीव्ह जॉब्ज यांच्या 44 वर्षे जुन्या बायोडाटाचा लिलाव;32 लाख रुपयांत लिलावाचा अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोस्टन- अॅपलचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांनी नोकरीसाठी केलेल्या अर्जाचा लिलाव होणार आहे. त्या वेळी ते महाविद्यालयात शिक्षण घेत होते. स्टीव्ह यांनी १९७३ मध्ये हा अर्ज केला होता. हा अर्ज केल्याच्या तीन वर्षांनंतर त्यांनी स्टीव्ह व्होजनियाक यांच्यासोबत अॅपलची स्थापना केली होती. बोस्टनच्या “आरआर ऑक्शन हाऊस’च्या वतीने आठ ते १५ मार्चदरम्यान ही लिलाव प्रक्रिया होणार आहे. या अर्जाला सुमारे ३२ लाख रुपयांची बोली लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर जॉब्ज यांची स्वाक्षरी असलेले पेपर कटिंग आणि एका “मॅक ओएस एक्स’चाही लिलाव होणार आहे.  


इंग्रजी साहित्याचे शिक्षण घेत असताना सांगितले टेक अन् डिझाइनर इंजिनिअर  : जॉब्ज १९७३ मध्ये इंग्रजी साहित्याचे शिक्षण घेत होते. त्या वेळी त्यांनी हा एक पानाचा बायोडाटा तयार केला होता. डाव्या बाजूला सर्वात वरती वर्ष लिहिले होते अाणि कोणत्या पदासाठी अर्ज केला आहे तो रकाना रिकामा ठेवला होता. अर्जाच्या उजव्या बाजूला नाव : स्टीव्हन जॉब्ज, पत्त्याच्या जागी रीड कॉलेज असे लिहिलेले आहे. वडिलांच्या पैशाची बचत व्हावी यासाठी ओरेगॉन येथे असलेल्या या महाविद्यालयातील शिक्षण जॉब्ज यांनी अर्धवट सोडून दिले होते. शिक्षणाच्या रकान्यात इंग्रजी साहित्य लिहिले अाहे. वाहन परवान्यासमोर ‘हो’ लिहिलेले आहे. वाहतुकीच्या सुविधेच्या कॉलमध्ये लिहिले - भविष्यात असू शकते, पण सध्या नक्की नाही. फोन नंबरच्या समोर “नो’ लिहिले आहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, स्टीव्ह जॉब्ज यांचा नोकरीसाठीचा पहिला अर्ज.... 

बातम्या आणखी आहेत...