आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6.5 लाख कोटींचे मार्केट कॅप गाठणारी भारतातील पहिली कंपनी बनली टीसीएस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टीसीएसचे बाजार भांडवल मूल्य (मार्केट कॅप) ६.५० लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. अशी कामगिरी करणारी टीसीएस देशातील पहिली कंपनी ठरली आहे. वित्तवर्ष २०१८ च्या पहिल्या तिमाहीत कंपनीचे शेअर्स ६.५ टक्क्यांनी उसळले.

 

यामुळे मार्केट कॅपही वाढला. कंपनीच्या शेअर्सचा भाव ५२ आठवड्यांच्या ३,३९९.९० रुपये या उच्चाकांवर पोहोचला आहे. एकूण ६,९०४ कोटींचा नफा झाला. संपूर्ण वर्षभरात टीसीएसचा नफा ५.७१% वाढला. वार्षिक आधारावर कंपनीचे उत्पन्न ८.२% वाढले.


यादरम्यान टीसीएसचे उत्पन्न २९,६४२ कोटी रुपये होते. कंपनीचा वर्षभराचा महसूल ४.३५% वाढीसह १ लाख २३,१०४ कोटी रुपये होता.  दुसरीकडे, वर्षभरात निव्वळ नफा १.८% वाढीसह २५,८२६ कोटी रुपये होता. मार्केट कॅपनुसार टीसीएसनंतर रिलायन्स इंडस्ट्रीज ५.८ लाख कोटी रुपयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. जगात सर्वाधिक मार्केट कॅप अॅपलचे ४९.९ लाख कोटी रुपये आहे.  ते टीसीएसपेक्षा आठपट जास्त आहे. ३८.३ लाख कोटींसह गुगलची अल्फाबेट कंपनी दुसऱ्या स्थानी आहे.


देशाच्या ऑटोमेशन इंडस्ट्रीत टाटानेच गेल्या वर्षभरात सर्वाधिक विकासदर गाठला. यात टाटाने लाँच केलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रोग्रॅमचा सर्वाधिक वाटा आहे. इतर आयटी कंपन्या एआयला आपल्या एखाद्या उत्पादनाच्या सेवेच्या रूपात लाँच करत अाहेत. टाटाने मात्र गतवर्षी इग्निओ नावाचे स्वतंत्र एआय उत्पादन लाँच केले, जे यशस्वी ठरले.

बातम्या आणखी आहेत...