आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेत आहे तुम्हालाही नोकरीची संधी, 1.30 लाख पदांसाठी लवकरच होणार भरती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर या रेलवमध्ये तुमच्यासाठी नोकरीचा उत्तम पर्याय मिळू शकतो. रेल्वे 89 हजार पदांची भरती काढल्यानंतर पुन्हा एकदा 1 लाख 30 हजार पदे भरण्याचा विचार करत आहे. रेल्वेच्या 89 हजार जांगासाठी एक कोटीपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. 

 

केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले, रेलवेमध्ये 2 लाख 40 हजार नाॅन गॅझेटेड पदे रिक्त आहेत. ही भरती योग्य उमेदवारांसाठी अधिसूचित केली गेली आहे. आॅल इंडिया रेडिओ ने देखील पीयूष गोयल यांचा हवाला देत ट्वीट केले आहे की रेल्वेत 2 लाख 40 हजार नाॅन गॅझेटेड पदे रिक्त आहेत. 
 
तस पाहिलं तर 2.4 लाख रिक्त पदांपैकी आता पर्यंत फक्त 89 हजार पदांची भरती राबविली आहे. बाकींच्या पदांसाठी नंतर अर्ज मागवले जाणार आहेत. रेल्वेच्याच्या एका अधिका-याने मनीभास्करशी बोलताना सांगतिले की बाकींच्या पदांसाठी लवकरत भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. पण यासाठी कोणताही अवधी अजून निश्चित केलेला नाही. ही भरती रेल्वेच्या वेगवेगळ्या झोननुसार केली जाणार आहे. सूत्रांनुसार रेल्वेच्या मोठ्या दुर्घटना आणि वारंवार वाढलेल्या दबावामुळे रेल्वे रिक्त जागांची याचवर्षी भरती पूर्ण करणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...