आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रायव्हेट सेक्टरमधील कर्मचा-यांना मिळेल 20 लाखांपर्यंत टॅक्स फ्रि ग्रॅच्युटी, अॅमेडमेंट बिल मंजूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली. पेमेंट आॅफ ग्रॅच्युटी अॅमेडमेंट बिल आणि स्पेसिफिक रिलिफ अॅमेंडमेंट बिल या दोन महत्वपूर्ण बिलांना लोकसभेत गुरुवारी मंजूरी मिळाली आहे. ही दोन्ही बिलं कुठल्याही विरोधा शिवाय पास झाली. विरोधी पक्षाने या बिलांववर चर्चा आणि मत घेण्याची मागणी केली होती पण विरोधी पक्षाच्या गदारोळामुळे ही चर्चेविना ध्वनीमताने पास करावी लागली.

 

प्रायव्हेट सेक्टरमधील कर्मचा-यांना मिळेल 20 लाख रुपयांपर्यंतची टॅक्स फ्रि ग्रॅच्युटी 
 प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणा-या कर्मचा-याला 10 लाख रुपयांपेक्षा जास्त ग्रॅच्युटी दिली जाऊ शकत नाही अशी तरतूद पेमेंट आॅफ ग्रॅच्युटी अॅक्टमध्ये होती. यात सुधारणा केल्यानंतर आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणा-या कर्मचा-यांना 20 लांखापर्यंत टॅक्स फ्रि ग्रॅच्युटी मिळणार आहे. केंद्र सरकारच्या कर्मचा-यांना पहिल्यापासूनच 20 लाख रुपये टॅक्स फ्रि ग्रॅच्युटीची तरतूद केली गेली आहे. ट्रेड युनियन काही वर्षांपासून प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणा-या कर्मचा-यांसाठी ग्रॅच्युटी मर्यादा 10 लाखांवरुन 20 करण्याची मागणी करत होते. 


यामुळे होऊ शकली नाही चर्चा  

लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सदस्यांशी खासकरून पेमेंट आॅफ ग्रॅच्युटी अॅमेंडमेंट बिलावर चर्चा करण्याची विनंती केली. पण विरोधी पक्षाच्या गदारोळामुळे आणि टीडीपी सदस्यांच्या घोषणाबाजीमुळे श्रम आणि रोजगारमंत्री संतोष कुमार गंगवार यांनी बिल आणि अॅमेडमेंट सादर करण्याची परवानगी दिली. आरएसपी सदस्य एन. के प्रेमचंद्रन आणि काँग्रेस सदस्य अधीर रंजन चौधरी यांनी कपातीचा प्रस्ताव दाखल केला आणि त्यांचा हा प्रस्ता ध्वनीमताने फेटाळण्यात आला. तसेच सरकारने सादर केलेल्या अॅमेडमेंटचा स्वीकार करण्यात आला. 

 

सरकार निश्चित करणार मॅटरनिटी लिव्हची संख्या
 हे बिल पास झाल्यामुळे आत्ता सरकारच एखाद्या कर्मचा-याला जास्तीत जास्त किती मॅटरनिटी लिव्ह दिली जाऊ शकते हे निश्चित करु शकणार आहे. 1991 च्या कायद्याने जास्तीत जास्त मॅटरनिटी लिव्ह या मॅटरनिटी बेनिफिट अॅमेडमेंट अॅक्ट 2017 च्या माध्यमातून 12 एेवजी 26 आठवड्यांपर्यंत वाढवली होती. आता या बिलानुसार केंद्र सरकार जास्तीत जास्त मॅटरनिटी लिव्हची संख्या निश्चित करु शकते. 
 

 

बातम्या आणखी आहेत...