आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

82 कंपन्यांनी केले होते रिजेक्ट, आज 7000 जणांना देत आहे जॉब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आपल्या सगळ्यांचाच जीवनाचा यश-अपयश हा एक भाग आहे. अपयशही आपल्याला बरेच काही शिकवत असते पण तुम्ही कधी विचार केला आहे का, एखाद्या व्यक्तीला एक-दोन वेळा नव्हे तर 82 वेळा नोकरीसाठी नकार पचवावा लागला तर त्याचे काय झाले असेल. आज ही व्यक्ती एका मीडिया एजन्सीची चेअरमन आणि सीईओ आहे. चला जाणून घेऊ या व्यक्तीविषयी...

 

 

वारंवार रिजेक्ट झाल्यानंतर झाले नाहीत निराश
मीडियाकॉमचे चेअरमन आणि सीईओ स्टीव अॅलन यांनी मेहनतीच्या आणि चिकाटीच्या जोरावर यश संपादन केले आहे. अॅलन यांनी सांगितले की, त्यांना प्रत्येक वेळी नकार पचवणे खूपच अवघड गेले. त्यांनी यामुळे निराश न होता आपले प्रयत्न चालुच ठेवले.

 

 

82 वेळा रिजेक्ट झाल्यावर मिळाली नोकरी 
अॅलन यांना 82 वेळा रिजेक्ट झाल्यावर नोकरी मिळाली. त्यांना पहिली नोकरी एका ब्रिटीश मीडिया इंडस्ट्रीत मिळाली. आपली स्वप्ने साकार करण्यासाठी आपल्याला कामाचा अनुभव गरजेचा आहे हे त्यांच्या लक्षात आले. कामाचा अनुभव मिळाल्यावर त्यांनी नोकरीसाठी अर्ज केला आणि त्यांना यश मिळाले. त्यांना एका मीडिया कंपनीत नोकरी मिळाली आणि आज ते चेअरमन आणि सीईओ आहेत.

 

 

वयाच्या 30 व्या वर्षी बनले एमडी
अॅलन यांच्या म्हणण्यानुसार, दृढ़ संकल्पामुळे ते आज या कंपनीत 36 वर्षापासून कार्यरत आहेत. वयाच्या 30 व्या वर्षी ते कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर झाले. प्रमोशन मिळाल्यावर त्यांनी कंपनीतील प्रत्येक कर्मचाऱ्याची भेट घेतली. त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर उत्तरही शोधले. एका एमडीसाठी हे एक अवघड काम असते. त्यांनी कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यास दोन तासाचे काम दिले.

 

 

आज 7000 जणांना देत आहेत रोजगार
कधीकाळी स्वत: नोकरीसाठी फिरणारे अॅलन आज जवळपास 7000 जणांना रोजगार देत आहेत. कंपनीचे देशभरात 125 ऑफिस आहेत. यात 7000 जण काम करत आहेत. अॅलन यांचे म्हणणे आहे की, ते जीवनात पुढे जात राहिले याला कारण त्यांना माहिती होते की आपण हे करु शकतो.

 


                                                                                      

      

बातम्या आणखी आहेत...