आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील सगळ्यात श्रीमंत घराण्याची सून होणाऱ्या श्‍लोका मेहतांबद्दल न ऐकलेल्या 9 गोष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी हा श्लोका मेहता यांच्यासोबत लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. बुधवारी दोघांनी प्री इंगेजमेंट फंक्‍शनमध्ये भाग घेतला. श्लोका मेहता या डायमंड किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रसेल मेहता यांची कन्या आहे. श्लोका यांचे शिक्षण मुंबईत झाले आहे. यूरोपात आणि अमेरिकेत त्यांनी उच्च शिक्षण घेतले आहे. चला जाणून घेऊ यात श्लोका यांच्याविषयी 9 अननोन फॅक्‍ट्स...

 

 

1- श्‍लोका मेहता त्या रिच किड्समध्ये सामील आहेत ज्यांनी बिझनेसमध्ये नाही तर परोपकाराच्या क्षेत्रात आपले करिअर बनवले आहे. 
2- श्‍लोका रोजी ब्‍लू फाउंडेशनच्या संचालक आहेत. ही संस्था शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. 
3- श्लोक या ब्लॉगरही आहेत. त्यांना अभ्यासाव्यतिरिकत फिरण्याचीही आवड आहे.
4- श्‍लोका यांना परोपकाराचे काम करण्याची प्रेरणा त्यांचे आजोबा अरुण कुमार मेहता यांच्याकडून मिळाली. 
5- श्‍लोका अंबानी आपल्या कुटूंबाला पहिल्याही भेटल्या आहेत. श्लोका यांच्या मोठ्या बहिणीच्या लग्नासाठी मुकेश अंबानी बहरीन येथेही गेले होते.   
6- श्‍लोका यांची आई मोना मेहतासोबत नीरव मोदी यांचे कनेक्‍शन आहे. मोना मेहता यांच्या भावाचे म्हणजेच श्लोका यांचे मामा मयंक मेहता यांचे लग्न नीरव मोदी यांची बहिण पूर्वीसोबत झाले आहे.
7- श्‍लोका यांनी प्रिंसटन यूनिवर्सिटीतून मानवशास्त्राचा अभ्यास केला आहे. त्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स अॅण्ड पॉलिटिकल सायन्समधून विधी शास्त्रात स्नातकोत्तर डिग्री मिळवली आहे. 
8- श्‍लोका आणि आकाश यांचे लग्न डिसेंबरमध्ये होणार आहे. 
9- श्‍लोका यांच्या मते पैशापेक्षा मानवी साधनसंपत्तीची किंमत अधिक आहे. पैसे तुम्हाला नक्कीच मदत करतात पण ते माणसाची जागा घेऊ शकत नाही. 

बातम्या आणखी आहेत...