आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता आधार ऐवजी करा व्हर्च्युअल आयडीचा युज, अशाप्रकारे होतो जनरेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोबाइल सिम घेताना, बँक अकाउंट उघडताना आणि पेन्शन किंवा स्कॉलरशिपसाठी आधार ऑथेंटिकेशन करण्यासाठी तुम्ही आधार क्रमांकाएवजी तुमचा 16 अंकांचा व्हर्च्युअल आयडी (व्ही आयडी) देऊ शकता. भारतीय विशिष्ठ ओळख प्राधिकरण (UIDAI) 1 जुलैपासून ही सिस्टीम लागू करत आहे. आधारच्या नॉन स्टेट रजिस्ट्रार एजन्सीचे जीएम आणि एक्स्पर्ट कुमुद कुमार कर्ण यांनी सांगितले की व्ही आयडी सिस्टीम 1 मार्चपासून लागू होणार होती परंतु बँक आणि इतर संस्थांना सिस्टीम अपग्रेड करण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ देण्यात आला होता. यामुळे आता 1 जुलैपासून यावर अंमलबजावणी केली जाईल. हे फक्त आधार ऑथेंटिकेशनसाठी असेल. वरील व्हिडीओमध्ये पाहा व्हर्च्युअल आयडी जनरेट करण्याची प्रोसेस...

बातम्या आणखी आहेत...