आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावी नापास युवकाने अॅमेझाॅनला लावला 1.3 कोटींचा चुना, 5 महिन्यांनतर असा झाला खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- कर्नाटकातील चिंकमंगलुरू मधील एक दहावी नापास एका 25 वर्षीय युवकाने ई काॅमर्स कंपनी अॅमेझाॅनला 1.3 कोटींचा चुना लावला आहे. कंपनीला ही गोष्ट पाच महिन्यांतनर लक्षात आली. दर्शन एलियास ध्रुव नावाचा हा युवक एक कुरिअर कंपनीत काम करत होता. त्याच्यावर अॅमेझाॅन ने डिलीवरीसाठी दिलेल्या टॅबच्या देयकात फेरफार करण्याचा आरोप लावला आहे है। मीडिया रिपोर्टनुसार, दर्शनसोबत त्याचे काही साथीदारदेखील यात सामील आहेत. 


पोलीसांनी सांगितले, हे प्रकरण सप्टेंबर 2017 ते फेब्रुवारी 2017 या काळात समोर आले आहे. या काळात अॅमेझाॅनला  चिंकमंगलुरू शहरातून 4,604 आॅर्डर मिळाल्या होत्या. या सगळ्या प्राॅडक्टची डिलिव्हरी दर्शन केली होती. 

 


कसा लावला चुना ? 

रिपोर्टनुसार, दर्शन चिंकमंगलरमधील एकदंत कुरिअर कंपनीत काम करत होता. एकदंत आणि आणि अॅमेझाॅनमध्ये डिलिव्हरी आणि पेमेंटसाठी एक करार झाला होता. अॅमेझाॅन कडून प्राॅडक्टच्या डिलिव्हरी व पेमेंट संबंधी माहितीसाठी डिलिव्हरी बाॅयला एक टॅब दिला जात होता, पोलिसांच्या माहितीनुसार, दर्शनने याच टॅबमध्ये गडबड करून कार्ड स्वाइप करण्यासाठी एक नकली पेमेंट अलर्ट तयार केला होता. त्यामुळे आॅर्डर डिलिव्हर झाल्यानंतर अॅमेझाॅनकडे पेमेंट झाल्याचा एक नकली अलर्ट पोहचत होता आणि कंपनीला वाटत होते की पेमेंट झाले आहे, पण प्रत्यक्षात कंपनीला पैसे पोहचत नव्हते. दर्शन ने आपल्या मित्रांना महागडे प्राॅडक्ट्स मागवण्यास सांगितले नंतर पेमेंट केले नाही. 

 

पुढे वाचा कशी पकडली चोरी 

बातम्या आणखी आहेत...