आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AirAsia चा बिग सेल, सगळ्यात स्वस्त आंतरराष्ट्रीय तिकीट 999 रुपयात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- उन्हाळ्याच्या सुट्टीत एअर एशिया तुमच्यासाठी एक खास ऑफर घेऊन आली आहे. याअंतर्गत तुम्ही केवळ 999 रुपयांमध्ये तुम्हाला आंतरराष्ट्रीय तिकीट मिळत आहे. AirAsia ने 'बि‍ग सेल' नावाने ही ऑफर सुरू केली आहे.

 

 

या अंतर्गत तुम्ही 1 नोव्हेंबर ते 13 ऑगस्ट 2019 या कालावधीत प्रवास करु शकता. कंपनीच्या वेबसाईटनुसार, तुम्हाला तिकीट 27 मे 2018 पर्यंत बुक करावे लागेल. बिग सेल अंतर्गत एअर एशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसाठी स्वस्त दरात तिकीट मिळत आहे.

 

 

काय आहे ऑफर
एअर एशियाच्या वेबसाईटनुसार, भुवनेश्वरहून  क्वालालंपूर फ्लाइटचे तिकीट तुम्हाला केवळ 999 रुपयात मिळत आहे. या ऑफरतंर्गत तुम्हाला अनेक आंतरराष्ट्रीय डेस्टिनेशनचे तिकीट स्वस्तात मिळत आहे.

 

 

विशाखापट्टणम ते क्वालालंपूर- 1999 रुपये
कोची ते क्वालालंपूर- 3399 रुपये
गोवा ते क्वालालंपूर- 5514 रुपये 
हैदराबाद ते क्वालालंपूर- 4999 रुपये
जयपूर ते क्वालालंपूर- 3590 रुपये
नवी दिल्ली ते क्वालालंपूर- 4290 रुपये

 

 

नियम आणि अटी
 1  1 नोव्हेंबर 2018 ते 13 ऑगस्‍ट 2019 दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी ही ऑफर आहे.
2 तिकीट बुकिंग 27 मे पर्यंत करावी लागेल.
3 बुकिंग कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरुन www.airasia.com च्या माध्यमातून होईल.
4 क्रेडि‍ट कार्ड, डेबि‍ट कार्डच्या माध्यमातून करु शकता. चार्ज कार्डच्या माध्यमातून पेमेंट केल्यास नॉन रि‍फंडेबल प्रोसेसिंग फी द्यावी लागेल. 
5 तिकीटदरात एअरपोर्ट टॅक्सचा समावेश आहे. पण ज्या विमानतळावर एअरपोर्ट टॅक्स डिपाचरच्या वेळी घेण्यात येतो तेथे हे लागू नाही.

बातम्या आणखी आहेत...