आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरिबांची चिंता करतात अंबानींचे जावई, 30 ते 50 रुपयात होतात उपचार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अब्जाधीश अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल यांचे डिसेंबरमध्ये मुकेश अंबानी यांच्या मुलगी ईशासोबत लग्न होणार आहेत. ते 10 अब्ज डॉलरच्या पिरामल समूहाचे कार्यकारी संचालक आहेत. याशिवाय पिरामल एंटरप्रायझेसचे नॉन-एक्झुक्यूटिव्ह डायरेक्टर आणि पिरामल रिअॅल्टीचे संस्थापक आहेत. आनंद पिरामल यांची खास बाब ही आहे की ते केवळ बिझनेसमॅन नसून गरिबांची चिंता करणारे व्यक्तीही आहेत. याचे उदाहरण म्हणजे ते पिरामल ई-स्वास्थद्वारे देशातील सर्वसामान्यांवर ते केवळ 30 ते 50 रुपयात उपचार करतात.

 

 

काय आहे पिरामल ई-स्वास्थ
आनंद पिरामल यांनी आपल्या वडिलांचा व्यवसाय सुरु करण्यापूर्वी पिरामल ई-स्वास्थ नावाचे स्टार्टअप सुरु केले. या समुहाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार ज्या भागात डॉक्टर्स नाहीत तेथे उपचारासाठी अडचणी येऊ नयेत. यासाठी सुरु करण्यात आलेली ही टेलीमेडिसिन सेवा आहे. यात तुम्ही टेलिफोनच्या माध्यमातून डॉक्टरांना आजारीची माहिती देऊ शकता व उपचार करू शकता. या डॉक्टर तुम्हाला कमीत कमी किंमती कोणते औषध मिळते याचीही माहिती देतात. यासाठी केवळ 30 ते 50 रुपये खर्च येतो.

 

 

राजस्थानमधून करण्यात आली होती सुरुवात
पिरामल ई-स्वास्थची सुरुवात 2008 मधील राजस्थानातील चुरु जिल्ह्यातील एका गावातून करण्यात आली. तिथे गरज असल्यास सर्वसामान्यांना उपचार मिळणे अवघड होते. उपचारासाठी त्यांना मोठे अंतर पार करावे लागत होते. हे एका अर्थाने ग्रामीण स्टार्टअप होते. 

 

 

एका पध्दतीचे कॉल सेंटर
पिरामल ई-स्वास्थ केंद्रात आरोग्य सेवक असतात. ते तुमचे म्हणणे ऐकून घेतात व ही बाब डॉक्टरांना सांगतात. जर कोणता रिपोर्ट असेल तर याचीही माहिती दिली जाते. या बदल्यात डॉक्टर योग्य सल्ला देतात. जर औषधाने उपचार होणे शक्य असेल तर औषध सांगण्यात येते. ही या केंद्रातच कमीत कमी किंमतीत मिळते. आजार गंभीर असल्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात येतो.

 

 

40 हजारहून जास्त जणांवर उपचार
पिरामल ई-स्वास्थ केंद्राद्वारे आजपर्यंत 40 हजार जणांवर उपचार करण्यात आले आहेत. ही केंद्रे 200 हून अधिक गावांमध्ये आहेत. तेथे फार्मसी देखील आहेत.

 

 
 

बातम्या आणखी आहेत...