आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका मिनिटात 116 समोसे तयार करते ही मशीन, मसाला भरण्याचीही नाही गरज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- समोसा आपल्या सगळ्यांचाच आवडता पदार्थ आहे. अतिशय स्वस्तात मिळणारा मस्त पदार्थ अशी याची ओळख आहे. भारतात आता समोसा बनवणारी मशीनही आली आहे. ही मशीन पुर्णपणे ऑटोमॅटिक आहे. इतकेच नाही तर या मशीनने एका मिनिटात जवळपास 116 समोसे तयार करता येतात. 

 

 

# एका तासात 7 हजार समोसे
- या मशीनची खास गोष्ट ही आहे की ती एका तासात 7 हजार समोसे तयार करते.
- ही पूर्ण ऑटोमॅटिक मशीन आहे. पण तुम्हाला समोस्याचे पीठ आणि बटाट्याचा मसाला तयार करावा लागतो.
- या मशीनची फ्रेम स्टेनलेस स्टीलची आहे. त्यासाठी तुम्हाला 220V पॉवर कंजप्शनची गरज असते. 
- मशीनचे वजन 180KG आहे. याद्वारे तयार झालेल्या समोस्याचे वजन 75 ग्रॅमपर्यंत असू शकते.

 

# तळण्याची गरज
- या मशीनच्या वरती एक स्टीलचा बॉक्स असतो. त्यात बटाट्याचा मसाला भरावा लागतो.
- मैद्याच्या मळलेल्या पिठाला दुसऱ्या जागेवरुन भरण्यात येते. मशीनच्या आता या मळलेल्या पिठात मसाला आपोआप भरतो आणि बिगर तळलेला समोसा बाहेर येतो.
- त्यानंतर समोसा फक्त तळण्याची गरज असते. हे तुम्ही तुमच्या सवडीनुसार करु शकता.
- या मशीनची किंमत पाच लाख रुपये आहे. ती तुम्ही इंडिया मार्टवरुन खरेदी करु शकता.
- तुम्ही समोस्याचा बिझनेस करण्याविषयी विचार करत असाल तर ही मशीन तुम्हाला उपयोगी ठरेल.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी माहिती

बातम्या आणखी आहेत...