आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुकिंगनंतर २४ तासांच्या आत विमानाचे तिकीट रद्द केल्यास शुल्क लागणार नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली-  विमान कंपन्यांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मंगळवारी प्रवाशांसाठी एक मसुदा (चार्टर ड्राफ्ट) जारी केला. यातील प्रस्तावानुसार देशांतर्गत यात्रेसाठी तिकीट बुक केल्यानंतर २४ तासांच्या आत तिकीट रद्द केल्यास कॅन्सलेशन शुल्क वसूल करता येणार नाही. विमान उड्डाणाच्या निर्धारित वेळच्या ९६ तास आधीपर्यंत ही सुविधा मिळणार नाही. 
नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा म्हणाले, २४ तासांच्या लॉन इन वेळेत प्रवासी विनाशुल्क तिकिटावरील नावात सुधारणा किंवा तारखेत बदल करू शकतील. सध्या ठरावीक कंपन्या ही सुविधा देतात. चार्टरनुसार तिकिटावर कॅन्सलेशन शुल्क छापण्यात येईल. सरकारने ३० दिवसांपर्यंत चार्टरवर सूचना मागवल्या आहेत. यावर चर्चा झाल्यानंतर नियम सूचित करण्यासाठी जवळपास दोन महिन्यांचा वेळ लागेल. 


या मसुद्यानुसार, विमानाला उशीर झाला आणि कनेक्टिंग विमान हुकले तर कंपन्यांना भरपाई द्यावी लागेल. विमानाला १२ तासांपेक्षा अधिक उशीर झाल्यास २० हजारांपर्यंत भरपाई द्यावी लागणार आहे. ४ ते १२ तास उशीर झाल्यास १० हजार रुपये द्यावे लागतील. कंपनीने जर बोर्डिंगला नकार दिला तर प्रवाशाला कमीत कमी ५ हजार रुपये भरपाई देणे बंधनकारक आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...