आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अविवा लाइफ इन्शुरन्सकडून \'अविवा आय-टर्म स्मार्ट\' आयुर्विमा योजना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अविवा लाइफ इन्शुरन्सने आज 'अविवा आय-टर्म स्मार्ट' ही संरक्षणावर भर देणारी आयुर्विमा योजना सादर केली. यामध्ये ग्राहकाला परवडण्याजोग्या किमतीत आयुर्विमा देण्यात आलेला असून त्यासोबत गंभीर आजार किंवा विकलांगतेसाठी अतिरिक्त सुरक्षाही देण्यात आली आहे. किमान किंमत मोजून कुटुंबाला संरक्षण मिळेल याची काळजी या योजनेत घेण्यात आली असून, विमा काढणाऱ्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला तरी त्याचे कुटुंबीय यामुळे व्यवस्थित आयुष्य जगू शकतील.
 
 
अविवा आय-टर्म स्मार्ट ही मुदत विमा योजना आयुर्विमा काढलेल्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास वारसा व्यक्तीला (किंवा व्यक्तींना) म्हणजेच नॉमिनीला सर्व रक्कम देते. शिवाय, या योजना अविवा गंभीर आजार आणि विकलांगता रायडर- नॉन लिंक्ड रायडर हा एक पर्यायी रायडरही देऊ करते. हा अतिरिक्त पर्याय म्हणजे ग्राहक 16 प्रकारच्या गंभीर आजारांसाठी आणि आजारामुळे किंवा अपघातामुळे आलेल्या कायमस्वरूपी संपूर्ण विकलांगतेसाठी वाढीव संरक्षणाचा पर्यायही निवडू शकतो.
 
 
या उत्पादनसह, अविवाने ग्राहकाच्या हातात निवडीची शक्ती दिली असून, निवडण्यासाठी पर्याय दिला आहे. 18 वर्षे ते 65 वर्षे वयाचा ग्राहक ही पॉलिसी घेऊ शकतो. पॉलिसीची मुदत पूर्ण होईल तेव्हा ग्राहकाचे कमाल वय 80 वर्षे असावे (रायडरशिवाय), रायडरचा पर्याय स्वीकारल्यास त्याचे कमाल वय 70 असावे. विमा काढलेल्या व्यक्तीला 75 लाख रुपये ते 25 कोटी रुपये आश्वस्त रकमेच्या पॉलिसीसाठी हप्ते भरण्याचे वेळापत्रक बदलून घेण्याचीही मुभा आहे. हप्त्याचे वेळापत्रक वार्षिक, अर्धवार्षिक किंवा मासिक अशा स्वरुपाचे आहे.
 
 
या योजनेखाली, ग्राहकाला वाढीव कालावधीही मिळू शकतो. म्हणजेच हप्ते न भरल्यास पॉलिसी बाद झाली तरी भरलेल्या अखेरच्या हप्त्यानंतर दोन वर्षांच्या काळात ती पुनरुज्जीवीत करता येते. यासाठी नियम व अटी लागू आहेत. लाँचच्या वेळी अविवा इंडियाच्या ग्राहक, मार्केटिंग व डिजिटल प्रमुख अधिकारी अंजली मल्होत्रा म्हणाल्या, “भारतामध्ये विमा उतरवण्याचे प्रमाण खूप कमी आहे असे संशोधनांवरून दिसून येते. आदर्श मुदत विमा व्यक्तीच्या उत्पन्न क्षमतेच्या दहा पट असला पाहिजे असे म्हटले जात असले, तरी प्रत्यक्षात याबाबत खूपच तफावत आढळून येते. मुदत विमा ही ग्राहकांसाठी सर्वांत अनाकर्षक योजना आहे. कारण, बाजारात एकाच प्रकारच्या अनेक मुदत योजना उपलब्ध आहेत. त्यामुळे अस्पर्धात्मक उत्पादने निर्माण होतात आणि ती ग्राहकांचा विचार करून तयार केलेली नसतात. म्हणूनच, आम्हाला ग्राहकांना केवळ आणखी एक मुदत विमा योजना द्यायची नाही, तर एक खरोखरीच स्पर्धात्मक अशी स्मार्ट ऑनलाइन मुदत विमा योजना द्यायची आहे. अविवा आय-टर्म स्मार्टच्या माध्यमातून आम्हाला ग्राहकांना त्यांच्या कुटुंबियांचे भवितव्य परवडण्याजोग्या किमतीत सुरक्षित करण्याची एक संधी द्यायची आहे.”
 
 
प्रवेशासाठी वय किमान: 18 वर्षे पूर्ण
कमाल: 65 वर्षे पूर्ण    
परिपक्वतेच्या वेळेस कमाल वय: 80 वर्षे पूर्ण (रायडरशिवाय1)
70 वर्षे पूर्ण (रायडरसह1)    
हप्ता किमान: 3,861 रुपये (कर वगळता, रायडर हप्ता व अतिरिक्त हप्ता, असल्यास) 
कमाल: वय, मुदत आणि विम्याच्या निवडलेल्या खात्रीशीर रकमेवर अवलंबून    
विम्याची रक्कम किमान: 75 लाख रुपये
कमाल: 25 कोटी रुपये (प्रति आयुष्य) कंपनीच्या मंडळाने मंजूर केलेल्या अंडररायटिंग मार्गदर्शक तत्त्वांवर अवलंबून. 
 
अन्य वैशिष्टये:  
- वाढत्या जबाबदाऱ्या व जोखमींच्या परिस्थितीत, अविवा आय-टर्म स्मार्ट, ग्राहकांना पॉलिसीची रक्कम 25 लाखांपर्यंत वाढवण्याचा पर्याय देते. हा पर्याय एकदाच वापरता येतो तसेच त्यासाठी कोणत्याही वैद्यकीय तपासणीची आवश्यकता नाही. (नियम व अटी लागू) 
 
- वाढलेल्या रकमेच्या योजनेवरील हप्ता विमा घेणाऱ्या व्यक्तीचे ही विनंती स्वीकारण्याच्या वेळेस असलेले वय आणि पॉलिसीची उर्वरित मुदत किती आहे यावर मोजला जातो. 
 
 
 

 

बातम्या आणखी आहेत...