आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे 36km मायलेज देणारी इंडियाची सर्वात स्वस्त कार, किंमत टू व्हिलर एवढी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूटिलिटी डेस्क- भारतात या वर्षी लाँच होणारी सगळ्यात स्वस्त कार Bajaj Qute सतत चर्चेत आहे. कंपनी ही कार काही महिन्यांतच लाँच करु शकते। या कारची किंमत 1.30 लाख रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. राॅयल इनफिल्ड क्लासिक या टू व्हिलरची किमंत 1.35 लाख रुपये आहे. म्हणजे बजाजची ही कार टू व्हिलरच्या किमतीत येणार आहे. बजाजला या कारसाठी रोड अॅंड ट्रांसपोर्ट मिनिस्ट्रीकडून मंजूरी मिळाली आहे. मिनिस्ट्री ने या कार काॅड्रिसायकल तत्वावर मंजुरी दिली आहे. या सेगमेंटमधल्या कारचा स्पीड कमी असतो आणि इतर कार्सपेक्षा ही कमी प्रदूषण निर्माण करते. 

 

# 36kmpl असेल मायलेज 
बजाज Qute चे मायलेज जबरदस्त असेल. मीडिया रिपोर्टनुसार ही कार एक लिटर पेट्रोलमध्ये 36 किलोमीटरचे जबरदस्त मायलेज देईल. या कारमध्ये 216 सीसी चे पेट्रोल इंजिन असेल. कारचा टाॅप स्पीड 70 किमी प्रतितास असेल. असेही सांगितले जात आहे की ही कार CNG आणि LPG वर देखील धावू शकेल. या कारमध्ये स्पीड आणि पिकअप मेंटेन करण्यासाठी पाच गिअर बाॅक्स असतील. 

 

# असे असतील अन्य फिचर्स
या कारमध्ये अन्य हॅचबॅक कार सारखेच चार दरवाजे असतील. कारमध्ये चार लोकांना बसण्यासाठी जागा असेल. या कारची लांबी 2752mm, रुंदी 1312mm, उंची 652mm आणि व्हिलबेस 1925mm आहे. यामध्ये 3.5 मीटरचा टर्निंग सर्कल रेडिअस आहे. या कारचे वैशिष्टय म्हणजे लहान आकारामुळे पार्किंगची समस्या निर्माण होणार नाही. कारचे वजन 450 किलोग्रॅम असेल. कंपनी ने जेव्हा या कारची कंसेप्ट सादर केली होती त्यावेळी कारचे नाव बजाज RE60 ठेवले होते. 

 

पुढील स्लाईड्सवर पहा Bajaj Qute चे काही फोटोज......