आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅंक अकाउंटमधून काढत नसाल पैसे तर IT डिपार्टमेंट करणार चौकशी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तुमचे बँक खाते असले तरी तुम्ही तुमच्या सोयीनुसार त्याचा वापर करत असता. ही एक सामान्य बाब आहे. पण तुम्ही जर तुमच्या बँक खात्यात केवळ रक्कम जमा करत असाल आणि ती काढत नसाल तर तुम्ही सरकारच्या रडारवर येऊ शकता. सरकार अशा बॅंक खात्यावर लक्ष ठेवत आहे. आम्ही तुम्हाला बँकेतुन पैसे काढणे का गरजेचे आहे हे सांगत आहोत. 

 

 

तुम्ही दरमहा बँकेतुन पैसे न काढल्यास
जर तुम्ही पैसे खर्च आहात पण बँकेतुन पैसे काढत नसाल तर तुमचे हे वर्तन सरकारला संशयास्पद वाटू शकते. सीए अमरजीत चोप्रा म्हणाले की, तुम्ही रोजच्या गरजा आणि अन्य गोष्टींसाठी पैसे खर्च करत असाल तर त्या हिशोबाने तुमच्या बँक खात्यातून पैसेही काढलेले असावेत. जर तुम्ही तसे करत नसाल तर प्रश्न निर्माण होतो की तुमच्याकडे खर्च करण्यासाठी पैसे कुठून येतात.

 

 

ब्लॅकमनी 
अमरजीत चोप्रा यांच्या म्हणण्यानुसार जर कुठल्या व्यक्तीची बँक अकाउंटमध्ये विदड्रॉल हिस्ट्री नसेल तर इन्कम टॅक्स विभाग नोटीस बजावून विचारु शकते की तुमचा खर्च कसा भागवता. तुम्ही जो पैसा खर्च करत आहात तो कुठून येतो.

 

 

टॅक्स प्रोफाईलही होणार चेक
इन्कम टॅक्स विभागास हे कळाले की, तुमच्या बँक अकाउंटमधून कुठलीही रक्कम काढली जात नाही तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुमच्या पॅन डिटेलद्वारे तुमचे टॅक्स प्रोफाईल चेक करते. ते चेक करतात की तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करता की नाही. जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करत नसाल तर तुम्हाला नोटीस पाठविण्यात येते. तुमचे वार्षिक उत्पन्न किती? तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न का फाईल केले नाही?

 

 

कोणासाठी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणे गरजेचे
इन्कम टॅक्स कायद्याच्या विद्यमान नियमानुसार ज्याचे उत्पन्न 2.5 लाख रुपयाहून अधिक आहे अशा व्यक्तींना इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणे गरजेचे आहे. इन्कम टॅक्स रिटर्न तुमच्या वार्षिक उत्पन्नाचा पुरावा आहे.  
 

बातम्या आणखी आहेत...