आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारी बँक कर्मचाऱ्यांचा दोन दिवसांचा संप; ATM मध्येही खडखडाट होण्याची शक्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मे महिन्यात 30-31 मे रोजी 10 लाख बँक कर्मचारी संपावर जाणार. (फाइल) - Divya Marathi
मे महिन्यात 30-31 मे रोजी 10 लाख बँक कर्मचारी संपावर जाणार. (फाइल)

नवी दिल्ली- वेतन दरवाढीच्या कारणावरून सरकारी बँक कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचा संप पुकारला आहे. देशभरातील तब्बल 10 लाखांपेक्षा अधिक कर्मचारी 30 आणि 31 मे असे सलग दोन दिवस संपावर जात आहेत. या संपाचा फटका बँक ग्राहकांना बसणार आहे. दरम्यान, दोन दिवस बॅंक बंद राहणार असल्याने पैशाची अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एटीएममधून पैसे काढून  जवळ ठेवण्यावर अनेकांचा भर दिसून येत आहे. त्यामुळे एटीएमवर काही ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे.

 

 

बँक कर्मचाऱ्यांचा वेतनवाढीचा करार 31 ऑक्टोबर 2017 ला संपला आहे. त्यामुळे 1 नोव्हेंबर 2017 पासून नवीन वेतनवाढ होणे अपेक्षित आहे. मात्र ही वेतनवाढ न झाल्याने कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला. या संपाचा फटका बँक ग्राहकांना बसणार आहे. 

 

काय आहे बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या
- वेतन निर्धारण प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. 
- महागाईनुसार वेतन आणि भत्ते निर्धारीत करावे. सर्वच ग्रेडच्या अधिकाऱ्यांचा यात समावेश करावा.

- बँक कर्मचाऱ्यांच्या संघटना यूनायटेड फोरम ऑफ बँक यूनियन्स आणि आयबीए यांच्यात 2 मे 2017 ते 12 नोव्हेंबर 2017 दरम्यान 13 बैठका झाल्या होत्या. पगारवाढीच्या विषयावर नुकतीच 5 मे रोजी शेवटची चर्चा झाली. मागील वर्षांच्या नोव्हेंबरपासून बँक कर्मचाऱ्यांना पगारवाढीतील फरक मिळालेला नाही.


10 लाख कर्मचारी 48 तास जाणार संपावर
- यूनायटेड फोरम ऑफ बँक यूनियन्सच्या बॅनरखाली बँक कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. या फोरमसोबत देशभरातील 9 बँक यूनियन आहेत. यात एसबीआयसह इतर सरकारी बँकांचे 10 लाख कर्मचारी सहभागी होणार आहेत. 30 मे रोजी सकाळी 6 वाजतापासून एक जूनच्या सकाळी 6 पर्यंत कर्मचारी संपावर जाणार आहेत. यामुळे बँकिंग सेवांवर मोठा परिणाम होणार आहे.

 

गेल्यावर्षी 15% वाढ, यंदा फक्त 2% का?
- 1 नोव्हेंबर 2012 ते 31 ऑक्टोबर 2017 पर्यंत बँक कर्मचाऱ्यांना 15% वेतनवाढ मिळाली होती. त्यामुळे बँक कर्मचारी म्हणाले, की 2% वाढ देऊन आमची खिल्ली उडवण्यात आली आहे. 
- आयबीएने म्हटले आहे, की स्केल-III पर्यंतच्या कर्मचाऱ्यांशी संबंधीतच चर्चा होईल.

बातम्या आणखी आहेत...