आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

87 कोटी लोकांनी लिंक केले आधार, लिंकिंग करताना तुम्ही ही चूक तर केली नाही ना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली. विविध सेवांसाठी आधार लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च आहे. आतापर्यंत 87 कोटी लोकांनी आधार लिंक केले आहे. पण काही आधार लिंकिंगच्या नावाखाली लोकांना फसवून त्यांचं नुकसान करत आहेत. लोकांना फोन करुन आधार लिंकिंगच्या नावावर त्यांच्या अकाउंटची माहिती घेऊन पैसे काढण्याचे अनेक प्रकार उघडकीस आलेले आहेत. आधार जारी करणारी सर्वोच्च आॅथॅरिटी UIDAI ने आधारच्या नावाने येणा-या काॅल्स पासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. तुम्ही अशी एखादी चूक करु नका ज्यामुळे तुमचं नुकसान होईल. आॅथॅरिटी ने स्पष्ट केले आहे की आधारच्या सगळ्या सेवांसाठी एकच वेबसाईट आणि एकच अॅप आहे. दूसरी कोणतीही वेबसाईट किंवा अॅप नाही.

 

फक्त एकच अॅप mAadhaar

 

UIDAI ने आपल्या ट्वीटरवर जारी केलेल्या नोटीसमध्ये नमूद केलं आहे कि त्यांचं एकच अधिकृत अॅप आहे. त्याच नाव mAadhaar आहे. याचं लेटेस्ट व्हर्जन गूगल प्लेस्टोअरवरुन डाऊनलोड करता येईल, तसेच uidai.gov.in ही एकमेव वेबसाइट आहे. 

 

पुढे वाचा लिंकिंग साठी कुठलाही काॅल नाही 

बातम्या आणखी आहेत...