आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Success: झुकेरबर्ग, बिल गेट्स यांनी नोकरी, व्यवसायात यशासाठी सांगितला कानमंत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम आणि जीवनाकडे पाहण्याचा स्वच्छ दृष्टीकोन असणे अत्यंत गरजेचे आहे. बिल गेट्स यांची पत्नी मेलिंडा आणि फेसबुकचे संस्थापक झुकेरबर्ग यांनी आपल्या यशाचे रहस्य सांगितले. बिझनेस इनसायडरने या बाबी सांगितल्या आहेत. तुम्ही या टिप्सद्वारे जीवनात नोकरी मिळवताना आणि व्यवसाय करताना याचा वापर करुन यश मिळवू शकता.

 

 

स्वत:वर ठेवा विश्वास  
फेसबुकचे संस्थापक मार्क जुकरबर्ग म्हणाले की, तुम्ही स्वत:वर विश्वास ठेवा. तुम्ही जेवढा विचार करता त्यापेक्षा तुम्ही निश्चितच तुम्ही अधिक करु शकता. मी फेसबुक सुरु केले तेव्हा मी केवळ 19 वर्षाचा होतो. त्यामुळे मला अनुभव नाही, असे सांगणे पहिल्यादा टाळा.

 

 

काम आणि घरादरम्यान ठेवा बॅलेन्स
कुटूंब, काम आणि करियर यांच्यात बॅलेन्स ठेवणे अवघड असते. विशेषत: महिलांसाठी हे अधिकच अवघड असते. तुमच्या कुटूंबाला वेळ द्या यामुळे तुम्हाला नुसतेच रिलॅक्स वाटणार नाही तर त्यामुळे नवे काही सुचण्यासही मदत होईल.

 

 

कॉलेजमधून बाहेर पडल्यावर लगेच व्हीपी नाही होता येत 
बिल गेट्स यांच्या मते शिक्षण पूर्ण केल्यावर तुम्ही लगेच 60,000 डॉलर महिना कमावू शकत नाही किंवा तुम्ही व्हाईस प्रेसिडंटही होऊ शकत नाही. तुम्ही हळुहळु प्रगती करता. कोणीच एका दिवसात यशोशिखरावर जात नाही. तुम्ही जे स्वप्न पाहता ते प्रत्यक्षात येऊ शकते पण त्यासाठी कष्ट आणि परिश्रमाला पर्याय नाही. तुम्हाला काम तर करावेच लागेल पण यश मिळाल्यावर ते पचवायलाही शिकावे लागेल.

 

 

कठीण प्रसंगांसाठी तयार राहा
तुम्हाला जे मिळावे असे वाटते ते मिळेलच असे नाही. त्यामुळे तुम्हाला राग  व नैराश्य येऊ शकते. त्यावर मात करुन योग्य दिशने मार्गक्रमण करा. तुमच्या जीवनात अनेक कठीण प्रसंग येतील पण तुम्हाला निराश न होता आपल्या ध्येयाचा पाठलाग करावा लागेल.

 

 

पालकांना जवाबदार धरु नका
तुम्ही चुकल्यावर त्यासाठी आपल्या पालकांना जवाबदार धरु नका. चुकांमधून शिका आणि त्या पुन्हा होणार नाहीत याची काळजी घ्या.    
 

 

बातम्या आणखी आहेत...