आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झुकेरबर्ग, बिल गेट्स यांनी दिल्या पैसे कमावण्याच्या टिप्स, युथने घ्यावा फायदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स आणि फेसबुकचे फाउंडर मार्क झुकेरबर्ग यांच्या या सिम्पल टिप्स तुम्हाला पैसा कमावण्यात मदत करू शकतात. आज आम्ही तुम्हाला यांचे असे काही रुल्स सांगत आहोत, जे तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी फायदेशीर ठरतील.


लोकांचे टॅलेंट जोडणे आवश्यक...
बिझनेस इनसायडरनुसार एका फेसबुक लाइव्ह प्रोग्राममध्ये बिल गेट्स यांनी सांगितले होते की,  हुशार होण्याची एकच पद्धत नसते. वेगवेगळ्या प्रकारच्या हुशार लोकांना एकाच ठिकाणी कायम ठेवणे तुम्हाला यशस्वी बनवू शकते. गेट्स यांना पहिले असे वाटत होते की, ज्या लोकांना आयक्यू लेव्हल चांगला असेल तेच लोक सर्वकाही करू शकतात. तुमचा आयक्यू तुम्हाला हुशार बनवत नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या स्किल तुम्हाला हुशार बनवतात. 


स्वतःवर ठेवा विश्वास...
फेसबुक फाउंडर मार्क झुकेरबर्ग यांनी सांगितले की, प्रत्येकाने स्वतःवर विश्वास ठेवावा कारण जेवढा तुम्ही विचार करतात त्यापेक्षात कितीतरी पटीने तुम्ही जास्त करू शकता. तुम्ही कोणतीही गोष्ट शिकू शकता यावर विश्वास ठेवा. तरुणपणी सर्वांच्या तोंडून तुम्ही हे ऐकले असेल की तुम्हाला कोणत्याही कामाचा अनुभव नाही, इतर लोक तुमच्यासाठी जास्त अनुभवी आहेत. झुकेरबर्ग यांनी पुढे सांगितले की, त्यांनी फेसबुकची जेव्हा सुरुवात केली तेव्हा ते फक्त 19 वर्षांचे होते.


पुढे वाचा, तरुणांना कोणता दिला सल्ला...

बातम्या आणखी आहेत...