आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Jio ला टक्कर देणारा BSNL चा प्लॅन, स्वस्तात दररोज 4 GB डेटा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- रिलायन्स जिओने डबल धमाका ऑफर जाहीर केल्यानंतर आता सरकारी कंपनी बीएसएनएलने फिफा वर्ल्ड कप रिचार्ज ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना फक्त 149 रुपयात दररोज 4 जीबी डेटा मिळणार आहे. 14 जून ते 15 जुलै या काळात फिफा वर्ल्डकप स्पर्धा रंगणार असून त्या संपूर्णकाळात रिचार्जची सुविधा उपलब्ध असेल.

 

बीएसएनएलचे सर्व सर्कल्स, वेबसाईट तसेच कंपनीच्या गॅलरीमधून ग्राहकांना रिचार्ज करता येईल. जिओ आणि एअरटेल या दोन कंपन्यांना कडवी टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने ही नवी ऑफर आणली आहे. बीएसएनएलच्या या ऑफरमध्ये ग्राहकांना 149 रुपयात फक्त इंटरनेट डेटा मिळेल. एसएमएस आणि कॉलमध्ये कोणतीही सवलत मिळणार नाही. फक्त 28 दिवसांसाठी हा प्लॅन आहे. जिओच्या ऑफरमध्ये दर दिवसाला 3 जीबी डेटा, अमर्यादीत कॉल्स आणि दिवसाला 100 एसएमएस मोफत आहेत. बीएसएनएलपेक्षा जिओ प्लानमध्ये डेटा कमी आहे. पण कॉल्स आणि एसएमएसची सुविधा आहे.

बातम्या आणखी आहेत...