आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Aircel-maxis case: कार्ती चिदंबरम यांच्याविरोधात चार्जशीट दाखल, ED ची कारवाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्याविरोधात एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटने (सक्तवसुली संचालनालय) एअरसेल-मॅक्सिस घोटाळ्याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात पी. चिदंबरम यांचा सुद्धा उल्लेख करण्यात आला आहे. 

 

 

कार्ती यांच्याविरोधात आरोप
कार्ती चिदंबरम यांच्यावर एअरसेल-मॅक्सिस करारात नियमांचे कथित उल्लंघन आणि घोटाळा केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी 1 कोटी 16 लाख 9380 रुपये जप्त केल्याचे एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटने आरोपपत्रात म्हटले आहे. यातील 26 लाख 444 रुपये मुदत ठेवी स्वरुपात आहेत. कार्ती चिदंबरम यांचे एक खाते सील करण्यात आले आहे. त्यामध्ये 90 लाख रुपये आहेत. याशिवाय त्यांचे अजून एक खाते सक्तवसुली संचालयनाच्या ताब्यात आहे. त्यामध्ये 8936 रुपये जमा आहेत.  

 

 

चिदंबरम यांची चौकशी

याशिवाय कार्ती चिदंबरम यांच्यावर आयएनएक्स मीडिया प्रकरणी 10 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. दरम्यान, एअरसेल-मॅक्सिस करार आणि मनी लॉन्डिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची दोनवेळा चौकशी केली आहे. याप्रकरणी पी. चिदंबरम यांनी अनेक वेळा म्हटले आहे की, आम्ही कोणतेही काम चुकीचे केलेले नाही.

बातम्या आणखी आहेत...