आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या PF अकाउंटमध्ये काही गडबड तर नाही ना, मिस्‍ड कॉल आणि SMS द्वारे करा चेक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली.  जर तुम्ही संघटित क्षेत्रात नोकरी करत असाल तर तुमच्या कंपनीला प्रत्येक महिन्या तुमच्या पीएफ अकाउंटमध्ये पैसे जमा करणे अनिवार्य आहे. कंपनी कित्येक वेळा कर्मचा-याच्या सॅलरीमधून पीएफची रक्कम कापते पण ती त्याच्या पीएफ अकांउटमध्ये जमा करत नाही. कर्मचा-यांच्या पीएफ अकाउंट्सचं व्यवस्थापन कर्मचारी भविष्य निधी संघठन म्हणजेत EPFO करते. ईपीएफओ अशा कंपन्यांचा पैसा रिकव्हर करण्यासाठी अॅक्शन घेते. पण कधी-कधी या प्रक्रियेला काही वर्षांचा कालावधी लागतो. त्यानंतरदेखील कर्मचा-याचे पीएफचे रिकव्हर होत नाहीत. त्यामुळे कर्मचा-याचं लाखों रुपयांचं नुकसान होऊ शकतं. 


प्रत्येक महिन्याला ठेवा आपल्या पीएफ अकाउंटवर नजर  
 EPFOने आता एक नवीन सुविधा निर्माण केली आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या पीएफ अकाउंटचे अपडेट नेहमी पाहू शकता व प्रत्येक महिन्याला कंपनी पेमेंट जमा करते की नाही देखील चेक करु शकता. तुम्ही हे मिस्ड काॅल किंवा एसमएस करुन जाणून घेऊ शकता. 

 

मिस्ड काॅलने चेक करा लास्ट काँट्रिब्युशन 

जर तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर अॅक्टिव्हेटेड आणि त्यासोबत मोबाइल नंबर देखील यूएएनला अॅक्टिव्हेट असेल तर तुम्ही तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर वरून 011-22901406 या नंबरवर मिस्ड काॅल करु शकता. दोन वेळा रिंग वाजल्यानंतर तुमचा काॅल आपोआप डिस्कनेक्ट होईल. जर तुमची यूएएन बँक अकाउंट नंबर, आधार आणि पॅन नंबर या पैकी कुठल्याही एक डाक्युमेंटशी जोडला गेला असेल तर तुमच्या मोबाइल लास्ट पीएफ काॅट्रिब्युशन आणि पीएफ बॅलंसची डिटेल्स येईल. ही सेवा मोफत आहे. जर मोबाईल स्मार्टफोन नसेल तरी देखील तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ शकता. 

 

पुढे वाचा मॅसेज करुन देखील मिळवता येईल माहिती 

बातम्या आणखी आहेत...