आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता सामान्य ड्रायव्हिंग लायसन्सनेही तुम्ही चालवू शकता commercial वाहने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- केंद्रीय परिवहन मंत्रालयाने दिल्ली समवेत सगळ्या राज्यातील परिवहन प्राधिकरणांना सांगितले की, टॅक्सी, ई-रिक्षा सारखी हलकी मालवाहू वाहने चालविण्यासाठी आता कमर्शियल ड्रायव्हिंग लायसन्सची गरज असणार नाही. आता एलएमवी परवाना असलेले वाहनचालकही ही वाहने चालवु शकणार आहेत. केंद्र सरकारकडून ही व्यवस्था लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मंत्रालयाकडून देण्यात आदेशात सेंट्रल मोटर व्हीकल अॅक्ट 1988 च्या कलम 2(21) चा हवाला त्यासाठी देण्यात आला आहे. 

 

 

दिल्ली समवेत सगळ्या राज्यांना जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे की वैयक्तिक हलकी वाहने चालविण्याचा परवाना असलेल्या व्यक्ती सगळी व्यावसायिक वाहने चालवू शकतात. त्यांना यासाठी वेगळा वाहन परवाना काढण्याची गरज नाही. राज्यांना सांगण्यात आले आहे की, परिवहन विभाग आरटीओ ऑफिससोबत इनफोर्समेंट टीमला याची माहिती देण्यात यावी आणि ही बाब लवकरात लवकर लागू करण्यात यावी. आता कोणत्याही पध्दतीची प्रवासी वाहने असो की हलकी किंवा जड व्यावसायिक वाहने असोत ती चालविण्यासाठी कर्मिशियल ड्रायव्हिंग लायसन्सची गरज असते. 

बातम्या आणखी आहेत...